Rohit Sharma Celebration: 35वं वनडे शतक अन् रोहित शर्माचा हटके अंदाज! खास सेलिब्रेशनचा अर्थ विचारताच हिटमॅन म्हणाला, 'हे माझ्यासाठी...' VIDEO

Rohit Sharma 35th ODI century: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने पुन्हा एकदा आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली.
Rohit Sharma Celebration: 35वं वनडे शतक अन् रोहित शर्माचा हटके अंदाज! खास सेलिब्रेशनचा अर्थ विचारताच हिटमॅन म्हणाला, 'हे माझ्यासाठी...' VIDEO
Published on: 
Updated on: 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने पुन्हा एकदा आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहितने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 72 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. या शानदार खेळीनंतर रोहितने केलेले सेलिब्रेशन मात्र सामन्याइतकेच चर्चेत आले.

शतक पूर्ण होताच हिटमॅनचा अनोखा अंदाज

रोहित शर्मा सहसा मोठ्या खेळीनंतरही शांतपणे सेलिब्रेशन करण्यासाठी ओळखला जातो. मात्र, यावेळी शतक पूर्ण होताच त्याने मैदानावर चक्क डान्स करत आनंद व्यक्त केला. रोहितचा हा अंदाज पाहून स्टेडियममधील चाहतेही जल्लोष करू लागले. रोहित म्हणाला, मी ते सेलिब्रेशन फक्त स्वतःसाठीच ठेवलं आहे. ते माझ्यासाठीच आहे.

रोहितच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. अनेक चाहत्यांनी त्याच्या या उत्साहाचे कौतुक केले. विशेष म्हणजे, वय आणि भविष्यातील क्रिकेट कारकिर्दीबाबत सुरू असलेल्या चर्चांना आपल्या फलंदाजीने उत्तर देण्याचा प्रयत्न रोहित करताना दिसत आहे.

2027 वर्ल्ड कपकडे रोहितचे लक्ष

रोहित शर्माच्या या खेळीची चर्चा 2027 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवरही होत आहे. वाढत्या वयामुळे त्याच्या कारकिर्दीबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात असताना रोहितने मैदानावर सातत्याने दमदार कामगिरी करण्यावर भर दिला आहे.

या शतकामुळे त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. त्यामुळे आगामी काळातही भारतीय संघासाठी त्याची भूमिका किती महत्त्वाची राहणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

गावस्करांचा 39 वर्षे जुना विक्रम मागे

या शतकासोबत रोहित शर्माने भारतीय क्रिकेटमधील आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. भारतीय भूमीवर वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज ठरला आहे.

रोहितने ही कामगिरी 39 वर्षे 153 दिवसांच्या वयात केली. याआधी हा विक्रम महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नावावर होता. गावस्कर यांनी 1987 मध्ये 38 वर्षे 113 दिवसांच्या वयात भारतात वनडे शतक झळकावले होते. त्यामुळे जवळपास चार दशकांनंतर रोहितने गावस्करांचा हा विक्रम मागे टाकला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 52वे शतक

या शतकी खेळीमुळे रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकांची संख्या 52 वर पोहोचली आहे. त्यामुळे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या यादीतही त्याची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.

रोहित आता वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा यांच्या 53 शतकांच्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने 54 शतकांसह त्याच्यापुढे आहे. त्यामुळे रोहितच्या पुढील सामन्यांतील कामगिरीकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असेल.

हिटमॅनचा जलवा कायम

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेगवान शतक, त्यानंतर मैदानावरील अनोखे सेलिब्रेशन आणि त्याच सामन्यात मोडलेला ऐतिहासिक विक्रम यामुळे रोहित शर्माची ही खेळी खास ठरली. वयाबाबत सुरू असलेल्या चर्चांना मैदानावरील कामगिरीतून उत्तर देत रोहितने चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची झलक दाखवून दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com