Sarmanas Cemetery Dainik Gomantak
गोवा

सारमानस स्मशानभूमीचे बुधवारी लोकार्पण

ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत प्रकल्पाची उभारणी, 31 लाख रुपये खर्च

दैनिक गोमन्तक

डिचोली: पिळगाव पंचायत क्षेत्रातील सारमानस भागातील लोकांची गेल्या कैक वर्षांपासूनची स्मशानभूमीची प्रतीक्षा एकदाची संपली आहे. ग्रामीण विकास यंत्रणेच्या ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत सारमानस येथे सर्व सोयीनीयुक्त अशी स्मशानभूमी बांधण्यात आली असून, येत्या बुधवारी (ता. 27) या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सुमारे 31 लाख खर्चून हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. मात्र सुरुवातीचे दोन-तीन महिने प्रकल्पाच्या कामाला सुरवातच झाली नव्हती. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य अनिश्चित होते. कधी एकदाची स्मशानभूमी पूर्णत्वास येऊन एखाद्याच्या अंतिम संस्कारावेळी होणारी अडचण दूर होणार, त्याकडे सारमानसवासियांचे लक्ष लागले होते.

सेसाचे (वेदांता) सहकार्य

सारमानस भागातील स्मशानाची जागा ही अत्यंत अडगळीच्या ठिकाणी असल्याने त्याठिकाणी अंत्यविधी करण्याचे टाळून स्थानिक मिळेल, त्याठिकाणी मोकळ्या जागेत अंत्यविधी उरकून घेत असत. ही अडचण लक्षात घेऊन पंच अनिल नाईक यांच्या प्रयत्नातून सारमानस भागात कार्यरत असलेल्या सेसा (वेदांता) खाण कंपनीने स्मशानभूमीसाठी नव्याने 500 चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली. याच जागेत ग्रामीण विकास यंत्रणेच्या ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत 31 लाख रुपये खर्चून स्मशानभूमी प्रकल्प उभा राहिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly: 'दादा' विरुद्ध कोणी केला खोडसाळपणा? 'FIR' दाखल करत कडक कारवाईची केली मागणी; नेमकं प्रकरण काय?

Goa Environment: पर्यावरण दाखल्याचा निर्णय रखडला; कारापूरवासीयांत नाराजी, 18 जूनपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा

खरी कुजबुज: काँग्रेसमध्ये खरेच दोन गट?

Goa Dams Water storage: जून अर्धा संपला, धरणे मात्र रिकामीच! राज्यातील जलसाठ्यांची चिंताजनक स्थिती, साळावली धरणात फक्त 28 टक्के पाणी

Mayem Lake: मये तलावावर आता 'कायाकिंग'ची मजा; निसर्गाच्या कुशीत जलविहाराचा आनंद

SCROLL FOR NEXT