Vishwajit Rane
Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

GMC मध्ये कर्करोग रूग्णांसाठी OPD सुरू होणार तर राज्यात टाटांची संस्था; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

Pramod Yadav

Goa Medical College: पुढील महिन्यापासून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात (GMC) कर्करोग रूग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करणार आहे. यामुळे राज्यातील रूग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

गोवा सरकार राज्यात कर्करोग संस्था उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. गुरुवारी याबाबत मुंबईस्थित टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. असेही राणे यांनी म्हटले आहे.

"टाटा मेमोरियल हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार आणि सेवा सुविधा पुरवते. भारत सरकार, गोवा सरकार आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्यात आसाम मॉडेलप्रमाणेच त्रिपक्षीय करार करण्याचा आमचा मानस आहे."

"टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा इन्स्टिट्यूटमध्ये सेवा, मनुष्यबळ, प्रशिक्षण आणि संशोधन यासाठी सर्व तांत्रिक सहाय्यता पुरवेल. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग रूग्णांसाठी समर्पित OPD सुरू केली जाणार आहे. 15 एप्रिल 2023 पासून हा पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाणार आहे. 15 एप्रिल पासून बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित होईल याबाबत GMC आणि आरोग्य सचिव यांना सूचना दिल्या आहेत." असे टविट राणे यांनी केले आहे.

आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांची गुरूवारी पणजी येथे मुंबईस्थित टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या (Tata Memorial Hospita) अधिकाऱ्यांशी बैठक झाली.

गोवा राज्यात कर्करोगाच्या वाढत्या रुग्णांमुळे, गोव्यातील नागरिकांना उपचारासाठी राज्याबाहेर जावे लागू नये यासाठी आम्ही 'राज्य कर्करोग संस्था' उभारण्यासाठी अव्याहतपणे काम करत आहोत. असे राणे यांनी बैठकीनंतर भाष्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT