Plastic Ban Dainik Gomantak
गोवा

राज्यात प्लास्टीक पिशव्या वापरात घट!

प्लास्टीक विरोधी जागृती मोहिमांना येतेय यश

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात प्लास्टीक बंदी लागू झाली असून राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने जागृती मोहिमा सुरू आहेत. पणजी मार्केट मध्ये या जागृतीचाच भाग म्हणून एक कपड्यापासूनच बनवेला फलक लावलेला त्यात पणजी मार्केट प्लास्टीकमुक्त करण्याचा संदेश दिला आहे.

खरेदीला येताना आपण स्वतःची पिशवी घेऊन यावे, अशा स्वरूपाच्या आशयाचा हा फलकही लावण्यात आला आहे. त्याच सोबत आता अनेक नागरिक बाजारात जाताना स्वतः कापडी पिशव्या घेऊन जाताना दिसतात.

त्याचसोबतच अनेक दुकांनांमध्ये देखील प्लास्टीक ऐवजी ग्राहक साहित्य नेण्यासाठी कापडी पिशव्या विक्रीस ठेवल्या आहेत. एकंदरीत पाहता प्लास्टीक बंदीच्या अनुषंगाने हे सकारात्मक पाऊलच म्हणावे लागेल. राज्यात अनेक ठिकाणी काही संस्थाद्वारे कापडी पिशव्यांचे वाटप देखील होत आहे. जेणे करून नागरिकांनी प्लास्टीक ऐवजी कपड्याच्या पिशव्यांचा वापर करावा.

पणजी मार्केट येथे गेल्या पंधरा दिवसांपासून काही संस्थांद्वारे प्लास्टीक पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मार्केट मधील काही दुकानांनी प्लास्टीक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या विक्रीस ठेवल्या आहेत. जेणे करून पिशवी न आणलेल्या ग्राहकाला पिशवी उपलब्ध होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT