Haat Kataro Khambo at Old Goa  Dainik Gomantak
गोवा

जुने गोवे येथील 'हात कातरो' खांबाला स्मृतीस्तंभ म्हणून घोषित करा; हिंदू जनजागृती समितीची मागणी

क्रांतिदिनाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हात कातरो’ खांबाला पुष्पहार अर्पण केला.

Pramod Yadav

Haat Kataro Khambo at Old Goa: जुने गोवे येथील ‘हात कातरो’ खांबाचे जतन व्हावे, तसेच भावी पिढीला लोकांच्या बलिदाचा इतिहास कळावा, या उद्देशाने गोवा शासनाने ‘हात कातरो’ खांबाला ‘स्मृतीस्तंभ’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक यांनी केली.

क्रांतिदिनाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हात कातरो’ खांबाला पुष्पहार अर्पण केला. यावेळी सत्यविजय नाईक बोलत होते.

"हात कातरो’ खांबाची माहिती इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली पाहिजे, तसेच खांबाच्या ठिकाणी खांबाच्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती असलेला फलक लावला पाहिजे" असे सत्यविजय नाईक म्हणाले.

यावेळी ‘केरलीय क्षेत्र परिपालन समिती’ बदलापूर (महाराष्ट्र) आश्रमाचे स्वामीजी पी.पी.एम्. नायर्, ‘शिव छत्रपती संघटने’चे सज्जन जुवेकर, आनंद मांद्रेकर, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, गोपाळकृष्ण मंदिराचे अध्यक्ष सत्यवान म्हामल, सचिव अशोक नाईक, दिवाडी येथील विद्याभारती संचालित सेंट एलॉयसियस् विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT