Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

कुणाला पाठिंबा द्यायचा हे निकालानंतर ठरवणार : सुदिन ढवळीकर

तृणमूल काँग्रेसशी युतीमुळे अभिषेक बॅनर्जींशी चर्चा करुनच निर्णय घेणार असल्याचं स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल काही वेळातच स्पष्ट होणार आहे. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष किंगमेकर ठरणार आहे. मात्र अद्याप मगोपने कुणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. निकालानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं मगोप नेते सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केलं आहे.

गोव्यात मगोपची तृणमूल काँग्रेससोबत (TMC) युती आहे. तृणमूलचे अभिजित बॅनर्जी गोव्यात दाखलही झाले आहे. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार असल्याचं सुदिन ढवळीकरांनी सांगिचसं आहे. कोणत्याही पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय एकटा मगो पक्ष घेणार नसून तृणमूल आणि मगो पक्ष एकत्र निर्णय घेणार असल्याचंही ढवळीकरांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान गोव्यात मगोला 9 जागा मिळणार असल्याचा विश्वास सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला आहे. एक्झिट पोलमध्येही मगोपला 5 ते 9 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे मगोपला (MGP) महत्त्व प्राप्त झालं असून सर्वच राजकीय पक्षांनी मगोपला गळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. असं असलं तरीही भाजपचे (BJP) प्रियोळमधील उमेदवार गोविंद गावडे यांनी मात्र भाजपला मगोपची गरज लागणार नसल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेसने एकहाती सत्ता मिळाली तरीही मगोपला सोबत सत्तेत घेण्याची तयारी दाखवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT