Dainik Gomantak
Dainik Gomantak
गोवा

Goa Death Case: पिता-पुत्राच्या एकाच दिवशी निधनाने राज्यात हळहळ व्यक्त

दैनिक गोमन्तक

राज्यातील हौशी मराठी रंगभूमीवरील नाट्य कलाकार आणि सांगे येथील प्रसिद्ध अशा कोसंबे घराण्याचे सुपुत्र एकनाथ कोसंबे (वय 88) यांचे आज सकाळी मडगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. धक्कादायक बाब म्हणजे त्यांचे पुत्र जयसंदेश (वय 58) यांचे आजच सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. या दोन्ही पिता-पुत्रांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने कोसंबे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

(death of father and son on same day expressed grief in state)

जयसंदेश कोसंबे हे गृहनिर्माण मंडळात अभियंते म्हणून काम करत होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले होते. एकनाथ कोसंबे यांच्यावर आज दुपारी ४ वाजता मडगाव स्मशानभूमीत त्यांचे पुत्र दयानिधेश यांनी अंत्यसंस्कार केले. त्यानंतर अवघ्या दीड तासातच जयसंदेशच्या निधनाची बातमी येऊन थडकली.

गोव्यातील प्रख्यात तबलापटू दयानिधेश यांचे ते वडील आणि भाऊ होते. जयसंदेश यांच्या मागे पत्नी रुपा आणि मुलगा योगन असा परिवार असून उद्या 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता मडगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एकनाथ कोसंबे हे गोवा सरकारच्या औद्योगिक विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक होते. हौशी रंगभूमीवरील त्यांच्या नाट्य कलेमुळे ते सर्वत्र परिचित होते. सांगे येथील शिगमोत्सव आणि रामनाथी येथील शिवरात्री उत्सवादरम्यान होणाऱ्या अनेक नाटकांत त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांच्या बहुतेक भूमिका संगीत नाटकातील होत्या, तर जयसंदेश यांना उत्कृष्ट अभियंते म्हणून ओळखले जात होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

SCROLL FOR NEXT