Goa Lok Sabha Elections| भाजपात अनेकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू; जोरदार मोर्चेबांधणी

लोकसभा निवडणुकीत दोन्ही नवे चेहरे?
Testing of candidates for Goa Lok Sabha elections begins
Testing of candidates for Goa Lok Sabha elections beginsDainik Gomantak

गोवा: भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून केंद्रीय मंत्र्यांना मतदारसंघात विशेष जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील दोन्ही मतदारसंघाच्या उमेदवारांबाबतही फेरविचार होऊ शकतो. सध्या लोकसभेत भाजपच्या 303 जागा असून 2024 च्या निवडणुकीत या पक्षाचे 403 जागांचे लक्ष्य आहे.

(Many people in BJP are trying their best for goa loksabha election)

Testing of candidates for Goa Lok Sabha elections begins
Goa Petrol Price|जाणून घ्या, गोव्यातील एक लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर

केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गेले दोन दिवस गोव्यात मुक्काम ठोकून आपल्याला जी जबाबदारी देण्यात आली आहे, त्या दक्षिण गोवा मतदारसंघात आपण आक्रमकतेने काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. सध्या गोव्यातील दोन्ही मतदारसंघात भाजपचाच भगवा फिरताना दिसतो आहे. त्या उलट काँग्रेस किंवा इतर पक्षांचा मागमोसही नाही. दक्षिण गोवा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत ॲड. नरेंद्र सावईकर केवळ 9 हजार 755 मतांनी पराभूत झाले होते. सावईकर गेली काही वर्षे या मतदारसंघाच्या संपर्कात आहेत आणि त्यांनी या मतदारसंघात महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीही चालविल्या आहेत,

परंतु या मतदारसंघात निवडणूक लढविण्यास दामू नाईक हेसुद्धा इच्छुक आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानामधील गणपतीचे दर्शन घेतले. ही भेट राजकीयदृष्‍ट्याही महत्त्वाची मानली जाते. कारण फडणवीस यांचा समावेश भाजपातील अत्यंत बलशाली अशा केंद्रीय निवडणूक समितीत करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे दुसरे नेते नितीन गडकरी यांचे महत्त्व अलीकडच्या काळात कमी होऊन फडणवीस यांचे वाढते प्राबल्य गोव्यासाठीही अनेकांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.

भाजपाच्या ज्येष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय पातळीवर भाजपला काही नवे चेहरेही रिंगणात उतरवायचे आहेत. गोव्यात त्यादृष्टीने एक सर्वेक्षणही सुरू झाले आहे. दोन्ही मतदारसंघात नवे उमेदवार पुढे आणता येईल का, याची चाचपणी सुरू झाली आहे.

Testing of candidates for Goa Lok Sabha elections begins
Global warming: जागतिक तामानवाढीचा गोवा किनारपट्टीवर परिणाम

उत्तर गोव्यात उमेदवारांच्या स्पर्धेत भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांचेही नाव असले, तरी या मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. गोव्यात ओबीसींची संख्या २७ टक्के, तर उत्तर गोव्यात ती ३५ टक्के आहे. त्यामुळे या मतदारसंघात ओबीसी उमेदवाराला डावलता येणार नाही. त्यादृष्टीने नवीन उमेदवार द्यायचाच असेल, तर दामू नाईक यांची वर्णी लागू शकते. त्याशिवाय दयानंद सोपटे व दयानंद मांद्रेकर ही नावेही चर्चेस घेतली जाऊ शकतात. दामू नाईक यापूर्वीच उत्तर गोवा लोकसभेची जबाबदारी आहे, त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो.

दरम्यान, काँग्रेसच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवारीसाठी विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, कॅप्टन व्हिरियेतो फर्नांडिस यांची नावे आहेत. फर्नांडिस त्यात आघाडीवर आहेत. गिरीश चोडणकर यांच्या मते दक्षिण गोव्याचे स्वरूप वेगाने बदलत आहे. काँग्रेसला जिंकून येण्यासाठी किमान दोन लाख मते प्राप्त करावी लागतील व पारंपरिक ख्रिस्ती मतांबरोबरच १ लाख हिंदूंची मते मिळवावी लागतील.

गेल्या निवडणुकीत सुदिन ढवळीकरांमुळे मडकईमध्ये पक्षाला मोठ्या फरकाने मते मिळाली. यावेळी मात्र ही स्थिती बदलली असेल. २०१४ च्या निवडणुकीत तरुणांनी आक्रमक उमेदवार असूनही आलेक्स रेजिनाल्ड यांचा नरेंद्र सावईकर यांनी हिंदू मतांच्या जोरावर पराभव केला होता. बदललेल्या समीकरणामुळे दक्षिण गोव्याच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीत गिरीश चोडणकर यांचेही नाव येऊ शकते. उत्तर गोव्यात रमाकांत खलप यांचे नाव आघाडीवर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com