Death Body found In River  Dainik Gomantak
गोवा

Goa Death Case: केळशीतील आढळला नदीत मृतदेह

केळशी येथील साळ नदीच्‍या पात्रात एका अज्ञात व्‍यक्‍तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

दैनिक गोमन्तक

Goa Death News: केळशी येथील साळ नदीच्‍या पात्रात एका अज्ञात व्‍यक्‍तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. अग्‍निशमनच्‍या जवानांच्‍या मदतीने मृतदेह पाण्‍याबाहेर काढण्‍यात आला.

ती व्यक्ती अंदाजे 30 ते 35 वयाची असून मृतदेह येथील दक्षिण जिल्‍हा इस्‍पितळाच्‍या शवागारात ठेवला आहे. अनैर्गिक मृत्‍यू म्हणून प्रकरण नोंदवले असून उपनिरीक्षक सुभाष गावकर तपास करीत आहेत.

नुवे येथे महिलेचा अनैसर्गिक मृत्‍यू

किरभाट-नुवे येथील मार्था वाझ या महिलेचा मृत्‍यू झाला. घराबाहेर कपडे धूत असताना ती अत्‍यवस्‍थ झाल्‍याने 108 मदतसेवेच्‍या ॲम्‍बुलन्‍समधून दक्षिण गाेवा जिल्‍हा इस्‍पितळात नेले असता, तेथील डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले.

अनैसर्गिक मृत्‍यू म्‍हणून मायणा-कुडतरी पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत.

अज्ञात व्‍यक्‍ती मृतावस्‍थेत आढळली

रेल्‍वे स्‍टेशन पार्किंग जागेत एक अज्ञात व्‍यक्‍ती मृतावस्‍थेत आढळली. ही व्यक्ती अंदाजे ६० ते ७० वर्षे वयोगटातील आहे. तो भिकारी असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT