Goa Univercity Dainik Gomantak
गोवा

Goa Univercity VC: सागरी विज्ञानातील संशोधक म्हणून मेनन यांची ख्याती

तिरुवल्ला केरळ येथे जन्मलेले डॉ. मेनन 1988 पासून गोवा विद्यापीठात कार्यरत आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विद्यापीठाचे (Goa Univercity) नवे कुलगुरू (Vice-Chancellor) म्हणून विद्यापीठाच्या सागरी विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. हरिलाल मेनन (Dean of Faculty of Marine Science, Dr. Harilal Menon) यांची नियुक्ती होणार आहे. कुलपती या नात्याने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी शोध समितीने सादर केलेल्या पाच नावांपैकी मेनन यांच्या नावाला पसंती दिली आहे. गेल्या महिन्यात कुलगुरू प्रा. वरुण साहनी सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. अधिसूचना जारी झाल्यानंतर मेनन यांना महिनाभरात या पदावर रूजू व्हावे लागणार आहे. गेले तीन दिवस कुलगुरू कोणाला करावे याविषयीची चर्चा सुरू होती. आणि काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यपालांशी चर्चा केली आणि हा विषय मार्गी लागला.

गोवा विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून निवड झालेले डॉ. हरिलाल भास्कर मेनन यांची ख्याती सागरी विज्ञानातील संशोधक अशी आहे. तिरुवल्ला केरळ येथे 31 जुलै 1962 रोजी जन्मलेले डॉ. मेनन 1988 पासून गोवा विद्यापीठात कार्यरत आहेत. त्याआधी ते एनआयओत कार्यरत होते.

त्यांनी आपली पदवी केरळमधील देवास्वॉम मंडळ महाविद्यालयातून 1982 मध्ये घेतली. 1984 मध्ये कोचीन विद्यापीठातून विज्ञानातील पदव्युत्तर पदवी घेतली. 1990 मध्ये त्यांनी कोचीन विद्यापीठातूनच पीएचडी पदवी मिळवली. 1985 ते1986 दरम्यान कोचीन विद्यापीठात ते कनिष्ठ संशोधन फेलो म्हणून कार्यरत होते.

दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेत वरिष्ठ संशोधन फेलो म्हणून त्यांनी 1986-87 मध्ये काम केले. गोवा विद्यापीठात व्याख्याते म्हणून त्यांनी 1988 ते 1993 दरम्यान काम पाहिले. त्यानंतर 1997 पर्यंत वरिष्ठ व्याख्याते म्हणून व त्यानंतर प्रपाठक म्हणूनही त्यांनी काम केले. यादरम्यान 1994 ते 96 दरम्यान हॅंबर्ग जर्मनी येथील सायन्टिस्ट इन्सिस्ट्यूट ओशियनोग्राफीत व्हिजिटींग सायन्टिस्ट म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्‍थेचे 1999 पासून तर कोचीन विद्यापीठाचे 2000 पासून ते सल्लागार होते. डॉ. मेनन यांना संगीत, वाचन, चित्रपट व क्रिकेटची आवड आहे. त्यांना जर्मन अकादमी एक्स्चेंज अवार्ड 1994 मध्‍ये प्राप्त झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: 12 ऑगस्टपासून संपणार आर्थिक चिंता! पगारवाढ अन् प्रमोशनचा योग; गुरु ग्रहाचा उदय 'या' राशीला करणार मालामाल

VIDEO: 5,100 पाठवत मुलगी म्हणाली, 'व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार दाखवा'; लेकरांची वाट बघत बाप गेला निघून, अखेर वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी दिला अग्नी

Hardik Pandya KKR Trade: IPL 2027 आधी मोठा ट्विस्ट! कोलकाताचा नवा 'कॅप्टन' हार्दिक पांड्या? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

US Student Visa: अमेरिकेचा भारतीय विद्यार्थ्यांना 'दे धक्का'! स्टुडंट व्हिसा मंजुरीत 62 टक्क्यांची घसरण; रिपोर्टमधून खुलासा

Salman Khan Assam Flood Relief: 'भाईजान' पुन्हा ठरला देवदूत! आसाममधील पूरग्रस्तांसाठी सलमान खान उभारणार 500 घरं; चाहते म्हणाले, 'Real Life Hero'

SCROLL FOR NEXT