Dashavtari  Dainik Gomantak
गोवा

Sattari: सत्तरीत दशावतारी नाटकांना पसंती..!

ट्रीकसीनची मोहिनी : धावेत ‘भेद कुष्मांडाचा महिमा टेंबलाईचा’ कलाविष्कार; मोठा प्रतिसाद

दैनिक गोमन्तक

Sattari: सत्तरी तालुक्यात अनेक वर्षांपासून दशावतार नाटकांची परंपरा आहे. पूर्वी दिवाबत्तीच्या उजेडात तेवढीच दर्जेदार नाटके सादर केली जायची व रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. कोकणात दशावतार हा कलाप्रकार लोकप्रिय बनलेला आहे. महाराष्ट्रात जत्रा व खास करून उत्तर गोव्यात मंदिरांचे कालोत्सव म्हटले की दशावतार नाटके आयोजित केली जातात.

सत्तरी तालुक्यात आजही या दशावतारी नाटकांना मोठी पसंती आहे. विशेषकरून ट्रिकसीनयुक्त नाटकांना प्रेक्षकवर्ग लाभतो.

30 डिसेंबर रोजी धावे येथे शांतादुर्गा मंदिराच्या सभामंडपात दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचा ‘भेद कुष्मांडाचा महिमा टेंबलाईचा’ हा ट्रीकसीनयुक्त कलाविष्कार सादर करण्यात आला.

नावारूपाला आलेले अभ्यासू कलावंत दत्तप्रसाद शेणई, रामचंद्र रावले, बाबा मयेकर व सहकलाकारांनी एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारत नाटकात रोमांच आणला.

पूर्वी दळणवळणाची सोय नव्हती. लोक सायंकाळीच एखाद्या गावातील कालोत्सवात जायचे व रात्रभर जागरण करून सकाळी परतीची वाट धरायचे.रात्री उशिरा नाटकांना प्रारंभ केला जायचा व सकाळी उजाडेपर्यंत कलाकार आपली कला जीव ओतून सादर करीत होते.

सत्तरीत आजही लोकमानसात हा दशावतार रुजलेला आहे व या नाटकांची चलती आहे. धावे येथे रसिकांनी मोठा प्रतिसाद नाटकाला दिला. साडेतीन तास रंगलेल्या नाटकाला रसिकांनी मोठी दाद दिली. कुष्मांड भेद सोहळा अगदी खराखुरा वाटून गेला.

दशावतार सादर करणारे कलावंत ही कला सादर करण्‍याचे कसब एकलव्‍याप्रमाणे स्‍वतः शिकतात. पुराणातील विविध पुस्तकांचे वाचन केले जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा कोकणच्या मातीत कोकणी माणसाने आजमितीपर्यंत आवर्जून जपलेला आहे. दशावतार हे त्याचे ठळक उदाहरण आहे. तो कोकणी माणसाचा सांस्कृतिक ठेवा आहे.

कर्नाटकचे यक्षगान व कोकणचा दशावतार यात बरेचसे साम्य आहे. काही वर्षांपूर्वी दशावतार सादर करणाऱ्या मोजक्याच कंपन्या होत्या; पण अलीकडे यात बऱ्यापैकी भर पडली आहे.

तरीही वालावलकर, पार्सेकर, मोचेमाडकर व चेंदवणकर गोरे, कलेश्वर, मामा मोचेमाडकर, जय हनुमान, आजगावकर, चेंदवणकर नाईक, बाळकृष्ण गोरे, दत्त माऊली या दशावतार कंपन्यांची मोहिनी रसिकांवर आजही आहे.

रसिकांना वर्षानुवर्षे आपल्या अभिनयाची मोहिनी घालणाऱ्या दशावतारी कलाकारांची या कलेतून मिळणारी आर्थिक मिळकत मात्र तुटपुंजीच आहे. मात्र, असे असूनही कलाकार कलेच्या श्रद्धेपोटी निष्ठेने काम करीत आहेत. कथानकातील पात्रे रंगमंचावर स्वत:चे संवाद बोलत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT