Vikat Bhagat appeal Dainik Gomantak
गोवा

Danielle McLaughlin Murder Case: डॅनियली मॅकलॉलीन हत्‍या प्रकरणी विकट भगतकडून जन्‍मठेपेच्या शिक्षेला खंडपीठात आव्हान

Irish woman murder Goa: डॅनियली मॅकलॉलीन हिच्‍या खूनप्रकरणी आरोपी विकट भगत याला दक्षिण गोवा सत्र न्‍यायालयाने १७ फेब्रुवारीला जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली होती

Akshata Chhatre

पणजी: राजबाग-काणकोण येथे आठ वर्षांपूर्वी ब्रिटिश युवती डॅनियली मॅकलॉलीन हिच्‍या खूनप्रकरणी आरोपी विकट भगत याला दक्षिण गोवा सत्र न्‍यायालयाने १७ फेब्रुवारीला जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्‍यानंतर विकट याने ‘त्‍या’ शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे.

डॅनियली हिचा मार्च २०१७ मध्‍ये राजबाग-काणकोण समुद्रकिनाऱ्यावर खून झाला होता. या प्रकरणात काणकोण पोलिसांनी विकट भगत याला अटक केली होती. खून करण्‍यापूर्वी तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार करण्‍यात आल्‍याचे शवचिकित्‍सा अहवालातून उघड झाले होते.

तपासी अधिकाऱ्यांनी भक्‍कम साक्षी-पुरावे तयार केल्‍याने विकटला शिक्षा झाली. दरम्‍यान, शिक्षेविरोधात विकटने खंडपीठात धाव घेतली आहे. ही याचिका लवकरच खंडपीठासमोर येईल.

विकट भगत आणि डॅनियली यांच्यात मैत्री होती. दरम्यान, होळीच्या उत्सवानंतर विकटने डिनियलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. विरोधानंतर देखील विकटने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. व नंतर खून केला. राजबाग - आगोंद येथे १३ ते १४ मार्च २०१७ दरम्यान ही घटना घडली. डॅनियलीच्या अंगावर सात जखमा आढळून आल्या होत्या. काणकोण पोलिसांनी याच तालुक्यातून विकटला अटक केली होती.

काणकोण पोलिसांनी विकटविरोधात ३७४ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विकटला या प्रकरणात न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले. आणि अखेर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT