मडगाव: डॅनियली आणि विकट भगत हे दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. खुनाची घटना घडण्याच्या वर्षापूर्वी डॅनियली काणकोण येथे आली असता तिची विकटशी गाठ पडली होती. त्यानंतर त्यांची गट्टी जमली हाेती.
गोव्यातून परत जाताना डॅनियलीने विकटला पुढच्या वर्षी आपण पुन्हा येऊ, असे सांगितले होते. या दोघांचीही एवढी दृढ मैत्री होती, असे असतानाही विकटने डॅनियलीचा खून का केला?
दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने विकट भगतला खून आणि बलात्कार या दोन्ही प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली असली तरी १३ मार्च २०१७ रोजी असे काय झाले की, मित्रत्वाचे संबंध असूनही विकट डॅनियलीच्या जीवावर उठला?, या प्रश्नाचे अजूनही मिळालेले नाही.
डॅनियली साहसाचे वेड असलेली तरुणी हाेती. बॅग खांद्यावर घेऊन भटंकती करणाऱ्या ‘बॅगपॅकर’ समूहाची ती सदस्य होती. २०१६ साली ती अशीच गोव्यात आली असता, ती काणकोणला उतरली होती. तेव्हा ती विकटच्या संपर्कात आली. असे म्हणतात.
डॅनियली विकटच्या प्रेमातही पडली होती. तपास अधिकारी निरीक्षक फिलोमेन कॉस्ता म्हणाले, त्यांचे एकमेकावर प्रेम होते की नाही हे माहिती नाही. मात्र, आम्ही विकटला अटक केली तेव्हा त्याने ती मैत्रिण होती, असे पोलिसांकडे कबूल केले होते.
विकटला दुहेरी जन्मठेपेची शिक्षाही ठोठावण्यात आली. मात्र, या खुनाचा प्रत्यक्ष साक्षीदार कुणी उपस्थित नसल्याने १३ मार्च २०१७ रोजी असे नेमके काय झाले की, चांगली मैत्रीचे संबंध असतानाही विकटने डॅनियलीवर बलात्कार केला. तिच्यावर बियरच्या बाटलीने हल्ला केला आणि त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. या प्रश्नाचे उत्तर मात्र अजूनही मिळालेले नाही.
मध्यंतरी विकटने तुरुंगात स्थानबद्ध असताना बहिणीला एक पत्र पाठविले होते. त्यात त्याने, या खुनात आपला हात नाही, असे म्हटले होते. त्या दिवशी होळीची पार्टी करून मध्यरात्री परतताना दोन अज्ञात युवकांनी आम्हाला अडविले. त्यांनी डॅनियलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. त्यांना अडविण्यास आपण धाव घेतली. मात्र, आपल्यालाही मारहाण केली.
डॅनियलीचा खून आपण केला नसून त्या दोघांनी केला, असे त्याने या पत्रात म्हटले होते. मात्र, विकटने स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा केलेला हा बनाव आहे, असे पाेलिसांनी तेव्हा सांगितले होते. या पत्राची शहानिशा करण्याचे पाेलिसांनी कुठलेही प्रयत्न केले नव्हते. तरी वेगवेगळे साक्षीदार पेश करून पोलिसांनी विकटवरील गुन्हा सिद्ध केला.
२३ फेब्रुवारी २०१७ : डॅनियली मॅकलॉग्लीन हिचे गोव्यात आगमन. हणजूण येथील एका कॉटेजमध्ये वास्तव्य.
१३ मार्च २०१७ : होळीची पार्टी साजरी करण्यासाठी डॅनियली आपल्या अन्य एका मैत्रिणीसह काणकोणात दाखल. आरोपी विकट भगत याच्यासह साजरी केली पार्टी.
१४ मार्च २०१७ : सकाळी ७ वाजता देवबाग-काणकोण येथील शेतात डॅनियलीचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह आढळून आला.
१४ मार्च २०१७ : सीसीटीव्ही फुटेजमध्ये डॅनियली आणि विकट एकत्र दिसल्याने काणकोण पोलिसांकडून सायंकाळी चारच्या सुमारास विकटला अटक. नंतर त्याने गुन्हा केला कबूल.
१५ मार्च २०१७ : डॅनियलीचा खून होण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट.
१६ मार्च २०१७ : विकटने लपवून ठेवलेले डॅनियलीचे रक्ताळलेले कपडे पोलिसांकडून जप्त.
१२ जून २०१७ : काणकोण न्यायालयात विकट याच्या विरोधात पोलिसांकडून सुमारे ५०० पानांचे आरोपपत्र दाखल.
१४ फेब्रुवारी २०२५ : दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांच्याकडून विकट दोषी असल्याचा निवाडा. सरकारी वकिलांकडून विकट भगत याला कठोरातील कठोर तथा फाशीची शिक्षा देण्याची मागणी.
१७ फेब्रुवारी २०२५ : न्या. क्षमा जोशी यांनी विकट भगत याला खून, बलात्कार या दोन्ही गुन्ह्यांखाली जन्मठेपेची तर पुरावा नष्ट केल्याबद्दल सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.