Goa Environment Dainik Gomantak
गोवा

Goa Environment:...यामुळे सांगेत धोकादायक झाडांची कापणी सुरू

सांगे मतदारसंघातील सर्व धोकादायक जीर्ण झाडे कापून टाकण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Goa Environment: अनिता फर्नांडिस या निष्पाप महिलेचा बळी गेल्यानंतर सांगेतील प्रशासन धोकादायक झाडे मुळासकट कापून टाकण्यासाठी कामाला लागले असून काल सकाळी सांगे बसस्थानकावर असलेले धोकादायक आंब्याचे झाड कापून सांगे मतदारसंघातील सर्व धोकादायक जीर्ण झाडे कापून टाकण्याकच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष प्रीती नाईक, उपनगराध्यक्ष केरोज क्रुझ, नगरसेवक संगमेश्वर नाईक उपस्थित होते.

सकाळी 7.30 वाजता या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पालिका पर्यवेक्षक लुईस फर्नांडिस सांगे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मोहिमेत सहभागी झाले होते.

हे आंब्याचे झाड मोटरसायकल पायलट थांबत असलेल्या बाजूने कलले होते. ते तोडल्यामुळे अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

उपजिल्हाधिकारी अश्विन चंद्रू, मामलेदार प्रवीणजय पंडित, सांगे तालुका सर्कल इन्स्पेक्टर विठू खरात, वन खाते, पोलिस, सांगे पालिका, पंचायत तलाठी अशा सर्वांना सोबत घेऊन सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी बैठक घेऊन नव्वद दिवसांत सर्व धोकादायक झाडे कापण्याची सूचना केली होती व हयगय केल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला जबाबदार धरणार असल्याचा इशाराही दिला होता.

कालपासून सुरू केलेली ही मोहीम सांगेतील नागरिकांना, दळणवळणासाठी धोकादायक असलेली सगळी झाडे कापल्यानंतरच थांबली पाहिजे. सांगेतील सगळ्या रस्त्यांच्या बाजूला असलेली जुनी झाडे कापून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करावेत.

केवळ कारवाई म्हणून चार-पाच झाडे न कापता सर्व्हे केलेली सर्व झाडे कापल्यास निष्पाप बळी गेलेल्या अनिता फर्नांडिस यांना ती खरी श्रद्धांजली ठरेल. - संगमेश्वर नाईक, नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Moon Eclipse: खगोलप्रेमींसाठी अविस्मरणीय क्षण! गोव्याच्या आकाशात लाल चंद्र दिसणार का?

Goa Badminton: पश्चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धेची चुरस! गोव्याच्या रेहानीला रौप्य, भगतला ब्राँझपदक

Ganesh Visarjan: ..गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला! ‘पणजीच्‍या राजा’ची भव्‍य मिरवणूक; राजधानीत ढोल-ताशांचा दणदणाट

Ministers Wealth: देशातल्या मंत्र्यांकडे पैसेच पैसे! भाजपमध्ये 14 अब्जाधीश, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर; वाचा ADR Report

Goa Cricket Coach: गोवा सीनियर महिला क्रिकेट प्रशिक्षकपदी नेहा तंवर! T-20 स्पर्धेने मोहिमेस होणार सुरवात

SCROLL FOR NEXT