Mapusa Municipality Dainik Gomantak
गोवा

'म्हापसातील धोकादायक झाडे मॉन्सूनपूर्वी हटवणार'

ज्योशुआ डिसोझा: म्हापसा पालिकेत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक

दैनिक गोमन्तक

म्हापसा: म्हापसा पालिका क्षेत्रातील सुमारे 41 धोकादायक झाडे कापण्याची आवश्यकता आहे, तसेच अन्य 55 झाडांच्या काही फांद्या छाटण्याची गरज आहे. हे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण केले जाईल, अशी माहिती आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी दिली.

म्हापसा शहरातील मॉन्सूनपूर्व कामांसंदर्भात आमदार डिसोझा यांनी म्हापसा पालिकेत विविध शासकीय खात्यांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेतली. शहरातील धोकादायक झाडे हटवण्यासोबतच जलस्रोत खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या पालिका क्षेत्रातील प्रमुख सात नाल्यांची साफसफाईही वेळेच्या आत एका एजन्सीमार्फत केली जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बैठकीला नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, मुख्याधिकारी सीताराम सावळ, जलस्रोत खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, आरोग्य खाते, वीज खाते, राष्ट्रीय महामार्ग, उपजिल्हाधिकारी कार्यालय आदींचे अधिकारी उपस्थित होते. तसेच उपनगराध्यक्ष शेखर बेनकर, नगरसेवक सुशांत हरमलकर, प्रकाश भिवशेट, प्रिया मिशाळ, बार्बरा कारास्को, साईनाथ राऊळ, तारक आरोलकर हेही हजर होते.

सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागांतील अशा प्रकारच्या धोकादायक झाडांची माहिती देण्याची विनंती करण्यात आली आहे, जेणेकरून उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यासंदर्भात संयुक्त पाहणी करून अशा धोकादायक झाडांसंदर्भातील अंतिम यादी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सुपूर्द केली जाईल. त्यानंतर ही धोकादायक झाडे पावसापूर्वी हटवण्यात येतील, अशी माहिती आमदार डिसोझा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT