Danger to local residents due to rock fall in quepem Dainik Gomantak
गोवा

टाकी शेल्डे येथे दरड कोसळल्याने स्थानिक रहिवाशांना धोका

लोकांनी कोणतीच उपाययोजना न करता घरे बांधली गेल्याने या ठिकाणी असलेल्या किमान पाच घरांना धोका निर्माण झाला आहे

दैनिक गोमन्तक

केपे: मुसळधार पावसामुळे काल टाकी शेल्डे येथील दरड कोसळून त्याठिकाणी राहणाऱ्या एका घरात माती घुसल्याने बाकी घरानाही धोका निर्माण झाला आहे.आज सकाळी कुडचडेचे आमदार नितेश काब्राल यांनी या घरांची पाहणी केली.

(Danger to local residents due to rock fall in quepem)

टाकी शेल्डे येथील ज्या ठिकाणी ही दरड कोसळली आहे ती अस्थिर जमीन असून अश्या धोकादायक ठिकाणी लोकांनी कोणतीच उपाययोजना न करता घरे बांधली गेल्याने या ठिकाणी असलेल्या किमान पाच घरांना धोका निर्माण झाला आहे असे काब्राल यांनी सांगितले. घरे बांधताना जागा व्यवस्थित न पाहता त्या जागेवर घरे बांधली असून घराच्या वरील भाग कोसळून खाली येऊ लागला आहे काल पेक्षा आज ही माती जास्त झाली असून दरडीचा भाग हळूहळू खचत असल्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी उप जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याठिकाणी राहणारे लोक गरीब असून त्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यकायला पत्र लिहून या संपूर्ण जागेची तपासणी करण्याची मागणी आपण करणार असून त्यानंतर काय ती उपाय योजना हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोक नको त्याठिकाणी घरे अंधून दोष सरकारला देतात हे चुकीचे असून जागेची पडताळणी करूनच घरे बांधावी असे काब्राल यांनी सांगितले.

गेल्या काही वर्ष्यापूर्वी याच ठिकाणी दरड कोसळण्याची भीती लक्षात घेऊन संरक्षक भिंत उभारण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण केले होते पण सदर भिंत बरीच उंच उभारावी लागणार आल्याचे लक्षात येताच कोणताच कंत्राटदार कामासाठी पुढे आला नाही असे काब्राल यांनी सांगितले. याठिकाणी राहणाऱ्या काही लोकांनी जमिनीवर अतिक्रमण करून पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या वाटा बंद केल्याने असे प्रकार घडतात असे सांगितले. आता फक्त दोन घरांना धोका बसला असून जर परत दरड कोसळून या घरावर आल्यास त्या घरखाली असलेल्या बाकीच्या घरांना धोका असल्याने त्वरित या जागेची पाहणी करण्याचे निर्देश आपण संबंधित अधिकाऱ्यांना देणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT