मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पूरग्रस्तांना दिले मदतीचे आश्वासन!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पूर परिस्थितीचा घेतला आढावा
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: राज्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, काही गावांशी संपर्क तूटला असुन, अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या दरम्यान त्यांनी पूरग्रस्त नागरिकांची भेट घेवून त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.

(Chief Minister Dr. Pramod Sawant promised help to the flood victims)

CM Pramod Sawant
दैव बलवत्तर म्हणून 'त्या' महिलेचा जीव बचावला

गोव्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पूर आलेल्या दावकोण गावात भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे सुद्धा उपस्थित होते.

पारोडा येथील पुलाचा एका बाजूचा कठडा गेला वाहून

काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे कुशावती नदीला पूर येऊन पाण्याच्या जबरदस्त प्रवाहामुळे पारोडा येथील पुलाचा एका बाजूचा कठडा वाहून गेल्याने सदर पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. रहदारी सुरू ठेवण्यास मुख्यमंत्र्यांकडून परवानगी

CM Pramod Sawant
Goa Live Updates : गोवा कॉंग्रेस विधिमंडळाचा एक गट फुटून भाजपमध्ये जाणार

हवामान खात्याने पुन्हा पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला

गोव्यासह कोकणाला दोन दिवस झोडपून काढल्यानंतर पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. मात्र आता हवामान खात्याने पुन्हा पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुराचं पाणी ओसरतं न ओसरतं तोच परत एकदा मुसळधार पावसाचा सामना गोवेकरांना करावा लागणार आहे.

राज्यातील पावसाचा आढावा

गोव्यात 1 जून ते 9 जुलै रोजी सकाळपर्यंत सरासरी 62 इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात उत्तर गोव्यात आतापर्यंत 59 इंच तर दक्षिण गोव्यात 64 इंच पाऊस झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात काल एकाच दिवसात सकाळी 8.30 ते सायंकाळी 4.30 पर्यंत पेडण्यात 2.63 इंच, म्हापशात 1.57 इंच, मडगावात 1.53 इंच, मुरगावात 1.06 इंच पाऊस झाला आहे. तर ओल्ड गोव्यात 24.5 मिमी आणि पणजीत 19.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com