Crocodile Attack Digital
गोवा

Crocodile Attack: काळी नदीतील मगर हल्ल्यात एक ठार

घटनास्थळी वन खात्याचे कर्मचारी दाखल

दैनिक गोमन्तक

दांडेली येथे काळी नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या एकावर दोन मगरींनी हल्ला केला असून, या हल्ल्याच एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

(Dandeli kali river one killed in crocodile attack)

मिळालेल्या माहितीनुसार गोवा कर्नाटक सीमेवर असणाऱ्या दांडेली येथे ही घटना घडली असून यामध्ये काळी नदीत तांबर दास माहेश्वरी (वय 62 रा.आंबेवाडी दांडेली ) हे अंघोळीसाठी उतरले होते. यावेळी दोन मगरींनी त्यांच्यावर हल्ला केला आणि माहेश्वरी यांना पाण्यात सुमारे 300 मिटर खोल फरफटत नेले. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. मगरीने मृतदेह खोल पाण्यात नेल्याने तो बराच वेळ मिळाला न्हवता मात्र सध्या तो मिळाला आहे.

घटनास्थळी असलेल्या काही नागरिकांनी माहिती दिली की, काळी नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मगरी आहेत. यापूर्वी ही अशा चार ते पाच घटना घडल्या आहेत. या घटनेबाबत वन खात्याला कळविले आहे. तसेच घटनास्थळी पोलिस ही दाखल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC T20 क्रमवारीत मोठा फेरबदल! अभिषेक शर्मा नंबर 1 वर कायम तर सूर्या-तिलक वर्मा यांची घसरण

Goa Drug Bust: थिवी रेल्वे स्थानकावर 3.5 लाखांचा अंमली पदार्थ जप्त, 25 वर्षीय नेपाळी नागरिकाला अटक; कोलवाळ पोलिसांची कारवाई

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Live Updates: मुंगुल हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला सशर्त जामीन मंजूर!

SCROLL FOR NEXT