म्हापसा : तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अनेक आजार होतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यासारखे विकार आयुष्यभर त्रास देतात. निरोगी जीवनासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. मोफत आरोग्य शिबिरातून मिळणाऱ्या औषध उपचारांचा लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर यांनी केले. त्या धुळेर येथे महाशक्ती संघाच्या ३४व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिरात बोलत होत्या.
ॲड. शशांक नार्वेकर यांनी महाशक्ती संघातर्फे दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. व्हिजन हॉस्पिटल व एच. आर. एस. कंपनी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिरात मोफत औषध उपचार करण्यात आले. सुमारे ११०नागरिकांनी या मोफत औषध शिबिराचा लाभ घेतला. रक्तदाब, मधुमेह, रक्त तपासणी, डोळ्यांची तपासणी करण्यात आली.
डॉ. नूतन बिचोलकर, डॉ. श्रेया बिचोलकर, डॉ. संदीप राजलबंडी, डॉ. मंजिता च्यारी, डॉ. वैष्णवी बिचोलकर, डॉ. साईल नाईक, डॉ. प्राची लोटलीकर, डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी व्हिजन हॉस्पिटलच्या टीमने तपासणी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धेश कारपूरकर, तुषार फुटाणेकर, संदीप कुडतकर यांनी सहकार्य केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.