Damu Naik  Dainik Gomantak
गोवा

Damu Naik: 'प्रेम असते, तेथेच भांडण असते'! तवडकर- गावडे विषयावरती दामूंची प्रतिक्रिया; वाद संपल्याचा केला दावा

Tawadkar Gaude Dispute: भाजप नेते रमेश तवडकर आणि गोविंद गावडे यांच्‍यात गेल्‍या काही वर्षांपासून विविध कारणांवरून शाब्‍दिक चकमकी झडत आहेत. हा वाद अनेक दिवस सुरू राहिला.

Sameer Panditrao

पणजी : जेथे प्रेम जास्‍त असते, तेथे भांडणे अधिक असतात. विद्यमान मंत्री रमेश तवडकर आणि माजी मंत्री गोविंद गावडे यांच्‍यातील वाद संपला आहे. या दोन्‍ही नेत्‍यांशी आपली चर्चा झाली आहे, असे भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भाजप नेते रमेश तवडकर आणि गोविंद गावडे यांच्‍यात गेल्‍या काही वर्षांपासून विविध कारणांवरून शाब्‍दिक चकमकी झडत आहेत. सभापती असताना तवडकर यांनी काणकोणातील संस्‍थांना कला-संस्‍कृती खात्‍याकडून योग्‍य पद्धतीने अनुदान मिळत नसल्‍याचा आरोप केला होता. त्‍यावेळी त्‍या खात्‍याचे मंत्री होते गोविंद गावडे.

त्‍यानंतर गावडे यांनीही प्रत्‍युत्तर दिले होते. हा वाद अनेक दिवस सुरू राहिला. त्‍यानंतर गत पावसाळी अधिवेशनाच्‍या काही दिवस आधी पक्षशिस्‍तीचे उल्लंघन केल्‍याचा ठपका ठेवत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळून त्‍यांच्‍या जागी तवडकर यांची वर्णी लावली.

त्‍यानंतर काही दिवसांपूर्वी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत तवडकर यांनी गावडेंवर पुन्‍हा हल्लाबोल चढवला. त्‍यालाही गावडेंनी उत्तर दिले. मंत्री तवडकर राबवत असलेल्‍या ‘श्रमधाम’ योजनेवरूनही गावडेंनी तोफ डागली. या दोन्‍ही नेत्‍यांतील वादामुळे भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांमध्‍ये अस्‍वस्‍थता पसरली होती.

या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांना पत्रकारांनी छेडले असता, तवडकर-गावडेंमधील वाद संपुष्‍टात आला आहे. आपण या दोन्‍ही नेत्‍यांशी चर्चा केली आहे, असे त्‍यांनी सांगितले. जेथे प्रेम जास्‍त असते, तेथे भांडणे अधिक होतात, अशी पुस्‍तीही त्‍यांनी जोडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik: माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन

Kamdhenu Cow: चेहरा देवीचा, शरीर पशूचे; समुद्रमंथनातून अवतरलेल्या 'कामधेनू गायीचा' वसुबारसशी काय संबंध? वाचा कथा आणि महत्व

Horoscope: नोकरीत प्रगतीची शक्यता, घरात शुभकार्य; प्रिय व्यक्तीकडून आनंददायी बातमी मिळणार

Dr. Abdul Kalam Inspiring Story: लहान वयात वर्तमानपत्रे विकली, शिक्षणासाठी बहिणीने सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या, वाचा 'मिसाईल मॅन' अब्दुल कलामांची प्रेरणादायी कहाणी

10 लाखांचं 800 लिटर अवैध डिझेल जप्त, 5 जणांच्या आवळल्या मुसक्या; मांडवी किनारी गोवा पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT