Shirgao Lairai Jatra Dainik Gomantak
गोवा

Shirgao Lairai Jatra: लईराई जत्रोत्सव तयारीचा दामू नाईकांनी घेतला आढावा, गर्दीवरील नियंत्रणासाठी स्वयंसेवक नेमण्‍याची सूचना

Lairai Jatra 2026 preparations : भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक य‍ांनी आज बुधवारी लईराई देवस्थानला भेट देत, येत्या २१ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या जत्रोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक य‍ांनी आज बुधवारी लईराई देवस्थानला भेट देत, येत्या २१ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या जत्रोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. शिवाय, भाजप युव‍ा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून जत्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वयंसेवकांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्य‍ांनी दिल्या.

आमदार प्रेमेंद्र शेट, प्रदेश भाजपचे सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दया कारबोटकर यांच्यासह स्थानिक सरपंच, पंच त्य‍ांच्यासमवेत उपस्थित होते.

लईराईच्या जत्रोत्सवाला दरवर्षी गोव्यासह अ‍ासपासच्या राज्यांतून हजारो भाविक उपस्थित राहत असतात. त्‍यांना सुरळीत व सुरक्षित दर्शन मिळावे आणि जत्रोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वयंसेवकांची व्यवस्था करण्याच्या सूचना आपण भाजप युवा मोर्चाला केलेल्या आहेत.

तयारीचा आढावा घेऊन देवस्थान समितीशी चर्चाही केलेली आहे, असे दामू नाईक य‍ांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेसाठी 'ढाल' बनल्यास इराण कोणालाही सोडणार नाही! मुज्तबा खामेनेईंनी सौदी अरेबिया, UAE आणि कतारला दिला सज्जड दम

US Strikes Iran: अमेरिकेकडून इराणवर हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या न्यूक्लियर डीलच्या दाव्यादरम्यान मिडल ईस्टमध्ये पुन्हा तणाव

Valpoi: वाळपईला कचऱ्याचा विळखा! उघडी गटारे, प्लास्टिक कचरा आणि सांडपाण्याची समस्या

Viral Video: 'आणखी खा चविष्ट समोसे, चिखल अन् पायाचा मळ एकत्र...', प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणारा व्हिडिओ व्हायरल; IRCTC नं घेतली दखल

Congress On Smart Meter: 'स्मार्ट मीटर'ची प्रक्रिया तात्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार: अमित पाटकरांचा इशारा

SCROLL FOR NEXT