Damodar saptah  Dainik Gomantak
गोवा

Damodar Saptah: वास्कोत दामोदर सप्ताहाची सांगता! समुद्रात श्रीफळ विसर्जन; गोपाळकाला उत्साहात

Vasco Saptah: २४ तास चाललेल्या श्री दामोदर भजनी सप्ताहाची खारीवाडा येथील समुद्रात श्रीफळ विसर्जन आणि त्यानंतर गोपाळकाला होऊन सांगता झाली. श्रीफळ विसर्जन मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते.

Sameer Panditrao

वास्को: २४ तास चाललेल्या श्री दामोदर भजनी सप्ताहाची गुरुवारी दुपारी खारीवाडा येथील अरबी समुद्रात श्रीफळ विसर्जन आणि त्यानंतर दामोदर मंदिरात गोपाळकाला होऊन सांगता झाली. श्रीफळ विसर्जन मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते.

दरम्यान, फेरी दोन आठवडे सुरू राहणार आहे. दरम्यान, राज्य महोत्सव दर्जा जाहीर होण्याची प्रतीक्षा कायम आहे.

वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदराच्या चरणी श्रीफळ अर्पण करून बुधवारी दुपारी १२६ व्या श्री दामोदर भजनी सप्ताहाला सुरुवात झाली होती. बुधवारी शेकडो भाविकांनी सप्ताहास हजेरी लावत श्री देव दामोदरचे दर्शन घेतले.

बुधवारी विविध धार्मिक विधीनुसार अखंड २४ तासांच्या भजनी सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ भजनी कलाकार अशोक मांद्रेकर यांनी जय जय राम कृष्ण हो या गजराने २४ तासांच्या भजनी सप्ताहाला सुरुवात केली. त्यानंतर साखळी पद्धतीने विविध भजनी पथकांनी आपले भजन सादर केले.

दरम्यान, सप्ताहानिमित्त श्री दामोदर भजनी उत्सव बाजारकार समितीतर्फे पार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त पोलिस वसाहतीजवळ रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत नामवंत भजनी कलाकारांच्या मैफली झाल्या.

नटराज थिएटर जवळ, मुरगाव पालिकेच्या मागे व श्री साईबाबा मंदिराजवळ या मैफली झाल्या. या बैठकीनंतर पार मंदिरात पहाटे ५वा. पोहोचले.

मैफलींचा रसिकांनी लुटला आनंद

दरम्यान, यंदा रसिकांना गायन मैफलींचा मनमुराद आनंद लुटता आला. गेल्या वर्षी १२५ व्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात गायनाच्या मैफली रात्री १२ वाजेपर्यंत आटोपल्या घेण्यात आल्याने, उशिरा आलेल्या लोकांना गायन बैठकीचा आस्वाद घेता आला नव्हता. त्यामुळे काही उत्साही कलाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. वास्को सप्ताहाच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या गायनाच्या मैफली लवकर झाल्याने त्या भागात रात्री बारा वाजल्यानंतर शुकशुकाट होता. मात्र यंदा कलाप्रेमींनी मैफलींचा मनमुराद आनंद लुटला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT