Damodar Saptah Vasco Dainik Gomantak
गोवा

Damodar Saptah Vasco: दामबाबच्या जयघोषाने आज वास्कोनगरी दुमदुमणार

Damodar Bhajani Saptah: धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; पोलिस यंत्रणा सतर्क

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: श्री दामोदर भजनी सप्ताहाला शनिवारी (ता. १०) सकाळी प्रारंभ होणार आहे. यंदा सप्ताहाचे शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्ष असल्याने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना ७ तारखेपासूनच सुरवात झाली.

सप्ताहानिमित्त स्वतंत्र पथ व सेंट जोसेफ वाझ मार्गावर फेरीची दुकाने थाटली आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी श्री दामोदर भजनी सप्ताह (बाजारकर) समिती, पोलिस दल, वाहतूक पोलिस, शहर आरोग्य विभाग, साबांखा, वीज विभाग, मुरगाव पालिका, उपजिल्हाधिकारी, मामलेदार कार्यालय व इतर संबंधित सरकारी यंत्रणा दक्ष आहेत.

जोशी कुटुंबीयांतर्फे श्रींना श्रीफळ : शनिवार, १० रोजी दुपारी १२.३० वाजता श्रीचरणी जोशी कुटुंबीयांतर्फे श्रीफळ ठेवल्यानंतर अखंड २४ तास भजनी सप्ताहाची सुरवात होणार आहे. भजनी कलाकार अशोक मनोहर मांद्रेकर यांच्या ‘जय जय राम कृष्ण हरी’ गजराने सप्ताहास सुरुवात होणार आहे. रविवार, ११ रोजी दुपारी १२.३० वा. गोपाळ काल्याने सप्ताहाची सांगता होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायबर फसवणुकीचे मोठे सिंडिकेट उद्ध्वस्त! 77 कोटींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश, 16 जणांच्‍या आवळल्‍या मुसक्‍या; गोव्‍यातून नऊजण ताब्‍यात

Today’s Horoscope: बुधवारचा दिवस 'या' 5 राशींसाठी 'लकी'! रखडलेली कामे मार्गी लागणार अन् उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार; भाग्याचीही मिळणार भक्कम साथ

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

SCROLL FOR NEXT