Damodar Bhajani meeting Dainik Gomantak
गोवा

दामोदर भजनी सप्ताह वार्षिक सभा उत्साहात संपन्न

यंदाचा सप्ताह साजरा करण्यासाठीचा निर्णय केंद्रीय उत्सव समिती घेणार

दैनिक गोमन्तक

वास्को : श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा वास्को येथील श्री दामोदर मंदिरात केंद्रीय समितिचे अध्यक्ष प्रशांत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात यंदाचा श्री दामोदर भजनी सप्ताह साजरा करण्यासाठी नवीन समितीची निवड करण्यात आली. श्री दामोदर भजनी सप्ताह समिती अध्यक्षपदी कृष्णा अर्जुन सोनूर्लेकर यांची तर सरचिटणीस संतोष खोर्जुवेकर यांची निवड करण्यात आली. समिति सदस्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदाचा श्री दामोदर भजनी सप्ताह धुमधडाक्यात साजरा करण्याच्या मागणीला जोर धरला. ( Damodar Bhajani Week Annual General Meeting passed with enthusiasm )

वास्कोतील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताह समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा वास्को येथील श्री दामोदर मंदिरात खेळीमेच्या वातावरणात संपन्न झाली. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर गेली सलग दोन वर्षे सप्ताह मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला नाही.

मात्र यंदा कोविड महामारीमुळे उसंत मिळाल्याने यंदाचा सप्ताह साजरा करण्याविषयी केंद्रीय उत्सव समितीतर्फे कोणता निर्णय घेतला जाईल याची उत्सुकता सर्व भाविकांना लागून होती. त्यानुसार रविवार(दि.३) घेण्यात आलेल्या श्री दामोदर भजनी सप्ताहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावर्षी तरी वार्षिक श्री दामोदर भजनी सप्ताह वास्कोमध्ये व्हावा अशी मागणी वास्कोतील नागरीकांकडून होत आहे. त्यानुसार श्री दामोदर भजनी सप्ताह सदस्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदाचा सप्ताह वास्को धुमधडाक्यात साजरा करण्याची मागणी या सभेत केली आहे. तसेच यंदाच्या सप्ताहासाठी नवीन उत्सव समिती निवडीच्या मागणीला अनुसरून नवीन श्री दामोदर भजनी उत्सव समिती (बाजारकार) निवडण्यात आली.

दरम्यान कोविड परीस्थिती बाबत राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यासंबंधी नवीन समिती निवडण्याचा निर्णय १५ जुलैं २o२२ नंतर घेण्यात जाईल. तसेच वास्कोत श्री दामोदर सप्ताह साजरा करण्यासंबंधी दक्षिण गोवाजिल्हाधिकान्यांना पत्र लिहीले असून त्यांच्या आदेशानुसार सप्ताह कशा पध्दतीने साजरा करायचा हा विषय यावेळी घेण्यात येईल. तसेच त्यांच्या निर्णयानुसार सप्ताह कार्यक्रमाची रूपरेषा आखण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

सुरुवातीला सर्वसाधारण सभा सुरू होण्याअगोदर उत्सव समितीतील दिवंगत सदस्यांना दोन मिनिटे स्तब्धता बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर केंद्रीय समिती अध्यक्ष प्रशांत जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर सरचिटणीस संतोष खोर्जुवेकर यांनी यंदाच्या सप्ताह साजरा करण्याविषयी सविस्तर माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT