Goa Fire News Dainik Gomantak
गोवा

Goa Fire News: भाटलेत गोदामाला आग; फर्निचर साहित्याचे नुकसान

Goa Fire News: भाटलेतील टायनी टॉट्स स्कूलपासून जवळच असलेल्या चर्चच्या मागील सोसायटीतील बंद गोदामाला आग लागल्याची घटना घडली.

दैनिक गोमन्तक

Goa Fire News:

भाटलेतील टायनी टॉट्स स्कूलपासून जवळच असलेल्या चर्चच्या मागील सोसायटीतील बंद गोदामाला आग लागल्याची घटना घडली. शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास या बंद गोदामातून धूर येऊ लागल्याचे निदर्शनास येताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

गोदाम बंद असल्याने नेमका प्रकार काय हे समजत नव्हते. मात्र, स्थानिकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण केले.

पणजी येथील अग्निशामक दलाच्या जवानांंनी स्थानिकांच्या मदतीने गोदाम उघडून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. हे गोदाम फर्निचर बनवणाऱ्या एका दुकानदाराचे असून यामध्ये फर्निचरसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू असल्याची माहिती मिळाली आहे.

या गोदामामध्ये देवाजवळ दिवाबत्ती केली असून कदाचित उंदरामुळे दिव्यातील वात खाली पडून आग लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.

गोदाम बंद असल्याने आग बाहेर पसरली नसून आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, फर्निचरच्या साहित्याचे किती नुकसान झाले, हे पंचनामा झाल्यावरच समजू शकेल, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT