‘गालजीबाग’ नदी पात्रातील कोल्याबांध बंधारा गेला वाहून Dainik Gomantak
गोवा

‘गालजीबाग’ नदी पात्रातील कोल्याबांध बंधारा गेला वाहून

नदीच्या‌वरच्या पात्राचे व जमिनीचे खाऱ्यापाण्यापासून संरक्षण करण्यासाठी हा बांध महत्वाचा ठरतो.

दैनिक गोमन्तक

काणकोण : गालजीबाग नदी पात्रातील अंतर्गत कोल्याबांध बंधारा दुर्लक्षित झाल्याने रविवारी वाहून गेला. नदीच्या‌वरच्या पात्राचे व जमिनीचे खाऱ्यापाण्यापासून संरक्षण करण्यासाठी हा बांध महत्वाचा ठरतो.

पावसाळ्यातही हा बंधारा या भागाचे खाऱ्यापाण्यापासून रक्षण करीत होता. मात्र, त्याची योग्य देखभाल न घेतल्याने तो वाहून खारे पाणी येथील शेतजमिनीत घुसून येथील शेतजमिनींना खाऱ्या तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचा परिणाम येथील बागायती व पेय जलाच्या विहीरीवर झाला असल्याचे येथील कार्यकर्ते सुनील पैंगणकर यांनी सांगितले.

गालजीबाग नदीचे दोन्ही तट केंद्रीय कृषी योजने मार्फत व जागतीक बॅंकेच्या सहकार्याने बांधण्यात येणार होते.मात्र काही जमिनदारांनी ना हरकत दाखला न दिल्याने ही योजना शीत पेटीत पडली. आता महालवाडा येथील वेळीपवाडा ते भटाबांधपर्यंत जलस्त्रोत खात्यातर्फे तीन कोटी रूपये खर्चून गालजीबाग नदीचा पैंगीणच्या बाजूच्या तटाला संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.त्यादृष्टीने सर्व्हेक्षण व अन्य सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत, असे पैंगणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Housing Society: सोसायटीतील भांडणं, तक्रारी आणि वादांना मिळणार पूर्णविराम! सरकार स्थापन करणार 'सहारा' प्राधिकरण

Shreyas Iyer: 4 सामन्यात एकही विजय नाही... सरपंच साहेबांना यशाचा सूरच गवसेना! श्रेयस अय्यरच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

Goa Rainfall: राज्यात गेल्या 24 तासांत सरासरी 23.9 मिमी पावसाची नोंद, 30 इंचांचा टप्पा पार; चार दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी

15 दिवस, 635 कॉल्स आणि दीड कोटींची मालमत्ता वाचवली! पावसाच्या प्रत्येक संकटात 'अग्निशमन दल' मदतीचा आधार

FDA Raid: वेर्णा, नागोवा येथे 12 आस्थापनांची तपासणी, 8 उपाहारगृहांना स्वच्छतेबाबत नोटिसा; दोन आस्थापने विनापरवाना

SCROLL FOR NEXT