Dainik Gomantak
Dainik Gomantak  Dainik Gomantak
गोवा

'गोमन्तक'च्या निर्भिड, निष्पक्ष पत्रकारितेची 60 वर्ष

दैनिक गोमन्तक

पणजी : ‘गोमन्तक’ हे गोवा मुक्तीनंतरचे गोव्यातील पहिलेवहिले दैनिक. 24 मार्च 1962 रोजी उदयास आलेल्या या वृत्तपत्रास आज 60 वर्षे पूर्ण होत आहेत. 1962 ते 2022 या कालखंडात या दैनिकाचे लोकमानसातील स्थान अढळ आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार ‘गोमन्तक’ ने रूप बदलले. जे वाचकांना मनात उतरले आहे. आज ‘गोमन्तक’ हे डिजिटल आणि टीव्हीच्या माध्यमातून घराघरात पोहचत आहे. गोव्याच्या इतिहासात अशा विविध रूपात वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचणारे हे एकमेव माध्यम आहे.

गोव्यात (Goa) या वृत्तपत्राद्वारे आधुनिक पत्रकारितेचा पाया त्यावेळचे संपादक (कै.) बा. द. सातोस्कर यांनी घातला. सातोस्कर यांच्या कुशल नेतृत्वाखाली ‘गोमन्तक’ लहानाचा मोठा झाला. त्याच्याआधी गोव्यात पत्रकारिता नावाची चीजच अस्तित्वात नव्हती. गोवा मुक्तीपूर्वी महाराष्ट्रातील मराठी व इंग्रजी वृत्तपत्रे गोव्यात काही प्रमाणात यायची, ती दुसऱ्या दिवशी पोचायची. तोपर्यंत त्यामधील बातम्या शिळ्या झालेल्या असायच्या. काही वृत्तपत्रांसाठी त्याकाळी गोव्यात प्रवेशही बंद होता.

मुक्तिपूर्व पत्रकारितेचा जन्म तसा 1821 साली पोर्तुगीज पत्रांनी झाला. पण प्रादेशिक भाषेतील एखादे दैनिक दीर्घकाळ टिकू शकले नाही. ‘भारतमित्र’ मासिक मात्र बराच काळ टिकून राहिले. गोव्यात वृत्तपत्रांना सेन्सॉरचा कायदा 1937 पासून लागू झाला. सेन्सॉरची कलमे अत्यंत त्रासदायक आणि कटकटीची असल्यामुळे वृत्तपत्रे टिकू शकत नसत. रोजच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत त्वरित पोहोचवायचे कार्य सर्वप्रथम ‘गोमन्तक’ने केले.

सिनेमा, नाटके, जत्रा, सर्कस यासारख्या मनोरंजक (Entertainment) कार्यक्रमांच्या व नोकरी, व्यवसाय वगैरेच्या जाहिराती, गोव्यातील जनतेशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या बातम्या वाचकांना सहजगत्या कळून येणे सोपे झाले. जाहिरातींमुळे अनेक उद्योग-धंद्यांची वाढ होऊ शकली. ताज्या बातम्या (News) त्वरित पोचवण्याचे कार्य केलेच, त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध संघर्ष आजही सातत्याने सुरू ठेवला. गोव्याबाहेरची दैनिके रोज गोव्यात येतात. गोव्यातही दैनिकांचे पीक वाढत आहे. पण या स्पर्धेत ‘गोमन्तक’ ताठ मानेने उभा राहिला आहे. या वर्तमानपत्राने गोमंतकीयांच्या हृदयात स्थान पटकावले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Goa Today's Live News Update: पणजी कधीच सोडणार नाही, अनेकांची स्वप्न ही स्वप्नच राहतील! मोन्सेरात

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

Watch Video: लंडनमध्ये PM मोदींची धूम! रन फॉर मोदी आणि फ्लॅश मॉब कार्यक्रमाचं भव्य आयोजन; भारतीय समुदायानं...

SCROLL FOR NEXT