जांबावली शिशिरोत्सवात नाट्यरसिकांसाठी मेजवानी

23 ते 30 मार्च या कालावधीत जांबावली येथे वार्षिक शिशिरोत्सवाचा कार्यक्रम होणार
Drama
Drama Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मठग्रामस्थ हिंदू सभेच्या उत्सव मंडळातर्फे 23 ते 30 मार्च या कालावधीत जांबावली येथे वार्षिक शिशिरोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त उद्या बुधवारी रात्री 9.30 वाजता श्री दामोदराचा हळदुण्याचा कार्यक्रम व कोंब येथे केणी यांच्या निवास्थानी श्रीफळाची पूजा होईल.

गुरुवार दि. 24 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता बॅंडवादनाने पुजलेल्या श्रीफळाचे भव्य मिरवणुकीने जांबावली येथे प्रयाण, रात्री 10 वाजता सं. ‘सीता स्वयंवर’ नाटकाचा प्रयोग होईल. शुक्रवार दि. 25 रोजी रात्री 9.30 वाजता कोकणी नाटक ‘बारा चल घरा’ सादर करण्‍यात येईल. या नाटकाचे लेखक तन्वी कामत बांबोळकर यांनी केले असून सुत्रधार साई पाणंदीकर, संगीत मांगिरीश काकोडकर यांचे आहे. केतन कुंदे, भारती नायक, केतन कुरतरकर, मोहित केणी, सिद्धार्थ याजी, अंजली पाणंदीकर, साध्वी नायक व अन्‍य कलाकारांच्‍या नाटकात भूमिका आहेत.

Drama
फातोर्ड्यात निनाद पानसेंच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

शनिवार दि. 26 रोजी रात्री 9.30 वाजता ‘अप्सरा आयल्यो दामबाबाल्या भेटीक’ हे कोकणी नाटक होईल. राजीव शिंक्रे लिखित-दिग्दर्शित या नाटकात राजीव शिंक्रे, विनया शिंक्रे, एकनाथ बाळे, आशिष बाळे, चंदू पै काणे, रंजिता पै, नागनाथ शानभाग, सुशांत कामत, माया मावजो, गौरी बोरकर, पांडुरंग शिरवईकर, नंदा कारे, रती भाटीकर, रीना पाणंदीकर, श्र्वेता प्रभुगावकर, पूजा भट, स्नेहा शिरवईकर, ईशा शिरवईकर, डॉ. व्यंकटेश हेगडे यांच्‍या भूमिका आहेत. रविवार दि. 27 रोजी रात्री 10 वाजता ‘मृत्युंजय’ हे तीन अंकी नाटक सादर करण्‍यात येईल. सदर नाटकाचे दिग्दर्शन वैकुंठ पै फोंडेकर यांनी केले असून छायाचित्रण शर्मद पै रायतुरकर यांचे आहे. या नाटकात 77 पेक्षा जास्त कलाकार सहभागी होणार आहेत.

Drama
हरमलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्पर्धांचे आयोजन

सोमवार दि. 28 रोजी संध्याकाळी 6 वाजता वेशभूषा व नृत्य स्पर्धा होणार आहे. रात्री 10 वाजता 35 कलाकारांच्या संचात ‘लावण्यतारका’ हा लावणीचा कार्यक्रम तर पहाटे 3 वाजता सं. ‘पंढरपूर’ हा नाट्यप्रयोग होईल. मंगळवार दि. 29 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजल्यापासून श्री दामोदराचा गुलालोत्सव साजरा होईल. रात्री 10 वाजता नवरदेवाची वरात, तर 12 वाजता संगीत सभा होणार आहे. बुधवार दि. 30 रोजी सकाळी 10 वाजता धुळपेटीने उत्सवाची सांगता होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com