Daily investigation report behind death of 19-year-old girl should be given to media Dainik Gomantak
गोवा

19 वर्षीय तरूणीच्या मृत्यू प्रकरणातील गुढ उकलेना

घटनेला तीन दिवस उलटले पोलीस तपासाची दिशा स्पष्ट होत नसल्याने तरुणीच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.

दैनिक गोमन्तक

शिवोली: तीन दिवस उलटले तरी 19 वर्षीय तरूणीच्या मृत्यू प्रकरणातील गुढ उकलेना. सोमवारपासूनच कामावर रुजू झालेली तरुणी बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आढळल्याने गोव्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गुरुवारी सकाळी कळंगुटच्या समुद्र किनाऱ्यावर 19 वर्षीय तरुणीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळला होता. घटनेला तीन दिवस उलटले पोलीस तपासाची दिशा स्पष्ट होत नसल्याने तरुणीच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, मुळ मधलामाज -मांद्रे येथे तरूणीचे कुटूंब बऱ्याच वर्षापासून हळदोणा पंचायत क्षेत्रातील नाश्नोळा येथे सरकारच्या वीस कलमी कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या घरात वास्तव्य करून राहात होते.

व्यवसायाने मोटरसायकल पायलट असलेल्या तरूणीच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच,  घरात दोन बहिणी आणी प्राथमिक शिक्षण घेत असलेला एकमेव भाऊ. हळदोणातील सेंट झेवीयर हायस्कुलमधून  दहावीपर्यतचे शिक्षण घेतलेल्या तरूणीने घरात थोडीफार आर्थिक मदत करण्याच्या द्रुष्टीकोनातून पर्वरीतील एका नामांकित मॉलमध्ये नोकरी पत्करली होती. मात्र कोवीड महामारीच्या पाश्वभुमीवर नोकरीवरुन ब्रेक मिळाल्याने ती गेले सहा महिने  घरीच होती. दरम्यानच्या काळात तरूणीला कोरोनाची लागण झाल्याने राहात्या घरातच कॉरॉन्टाइन होऊन ती उपचार घेत होती.

यादरम्यान ती थोड्याफार प्रमाणात मानसिक तणावाखाली दिसत होती असे तिच्या जवळच्या लोकांकडून समजले. दरम्यान, गेले  सहा- सात महिने घरात नोकरीविना घालवल्यानंतर  राज्यातील कर्फ्युत सरकारकडून थोडीफार ढील देण्यात आल्याने तरूणीने सोमवारपासूनच पर्वरीतील त्या नामांकित मॉलमध्ये कामावर  रुजू झाली होती. शुक्रवारी तरूणीच्या लहान बहिणीचा वाढदिवस होता त्यामुळे त्या दिवशी घरात खास कार्यक्रम घडवून आणण्याचे वचन तीने घरच्यांना दिले होते, मात्र दुर्दैवाने तो दिवस तीच्या जीवनात उजाडलाच नाही.

दरम्यान, तरूणीच्या मृत्यू हा कुणातरी अज्ञाताकडून रचण्यात आलेला मोठा घातपाताचा कट असल्याचा आरोप खुद्द तिच्या जवळच्या कुटुंबियांकडून सध्या व्यक्त केला जात आहे. घरातून बेपत्ता झाली त्या दिवसापासून म्हापसा बस स्थानकातील खाजगी बसमधून कळंगुट पर्यत प्रवास तीने केला होता अशी माहिती काही खाजगी बस वाहकाकडून मिळाली आहे.

दरम्यान, कळंगुट समुद्राच्या किनाऱ्यावर मृतदेह समुद्राच्या पाणी आणि किनारा यांच्यात असलेल्या दोन ते तीन मीटरच्या अंतरावर होता असे तेथील लोकांनी सांगितले. त्यामुळे किनारी भागातील परिसरात (दाट झाडीत) समागमास विरोध केलेल्यानंतर तरूणीला रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत अज्ञाताकडून पाण्यात बुडवून जिवंत मारण्याचा प्रयत्न झाला नसेल कशावरून ?

त्यामुळे म्हापसा बस स्थानक आणी कळंगुटचा शेवटचा बस थांबा या परिसरात स्थानिक पंचायत तसेच खाजगी आस्थापनातील सीसीटीव्ही फुटेजचा तपास  कळंगुट पोलिसांकडून शेवटच्या टप्प्यापर्यत झाला पाहिजे तसा तो अद्याप झाल्याचे दिसत नाही,  निरीक्षक रापोझ नेहमीच प्रसार माध्यमांंपासून अनेक गोष्टी  टाळत असतात अशा तक्रारी आहे.  त्यांनी आता मात्र  लोकांच्या उद्रेकाची वाट न पाहता या प्रकरणामागचा दरदिवशीचा तपास अहवाल प्रसार माध्यमांसमोर ठेवण्याची मागणी याभागातील प्रसिद्ध व्यवसायिक तसेच सामाजिक कार्यकर्ते  रिकार्डो डिसौझा यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT