dabolim selected model solar village goa  Dainik Gomantak
गोवा

PM Surya Ghar Yojana Goa: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! चिखली पंचायत क्षेत्रातील दाबोळी बनला आदर्श सौरऊर्जा गाव; केंद्राकडून मिळणार 1 कोटींचे अनुदान

Goa Green Energy Revolution: चिखली पंचायत क्षेत्रातील दाबोळी गावाची ‘आदर्श सौरऊर्जा गाव’ म्हणून निवड करण्यात आली. केंद्र सरकारकडून १ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: चिखली पंचायत क्षेत्रातील दाबोळी गावाची ‘आदर्श सौरऊर्जा गाव’ म्हणून निवड करण्यात आली असून, पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत समुदाय आधारित सौरऊर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी गावाला केंद्र सरकारकडून १ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. दक्षिण गोवा समन्वय व देखरेख समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबत घोषणा करण्यात आली.

या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असले तरी त्यांच्या अनुपस्थितीत उपजिल्हाधिकारी शर्मिला गावकर यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. वीज खात्याचे अधीक्षक अभियंता तथा समितीचे सदस्य सचिव राजीव सामंत यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत सौरऊर्जेबाबत जनजागृती वाढविण्यासाठी गोवा ऊर्जा विकास एजन्सी (जीईडीए)ने नोव्हेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत गोव्यात (Goa) सर्वेक्षण केले होते. दक्षिण गोव्यातील सात गावांची निवड करून त्यांच्यात सौरऊर्जेच्या वापरावर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आली. संबंधित गावांमध्ये किती घरांनी सौरऊर्जा प्रकल्प स्वीकारले, त्यांची क्षमता किती आहे आणि नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे, याचे मूल्यमापन करण्यात आले.

या स्पर्धेत लोटली आणि दाबोळी या गावांमध्ये विशेष चुरस होती. मात्र, सौरऊर्जेचा वाढता वापर, जनसहभाग आणि प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे दाबोळी गाव सरस ठरले. त्यामुळे या गावाची आदर्श सौरऊर्जा गाव म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती राजीव सामंत यांनी दिली. आता या योजनेची अंमलबजावणी ‘जीईडीए’मार्फत केली जाणार असून चिखली पंचायतीच्या सहकार्याने गावातील सौरऊर्जा सुविधांचा अधिक विकास केला जाईल. गावपातळीवर अक्षय ऊर्जेचा वापर वाढविणे, पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT