Dabolim Bogmalo flyover work Dainik Gomantak
गोवा

Dabolim: लोकांच्या जीवाशी खेळ! उड्डाण पुलाच्या कामामुळे चालकांना धोका, वास्कोत नियमांची ऐशीतैशी; सळ्यांची धोकादायक वाहतूक

Dabolim Bogmalo flyover work: दाबोळी - बोगमाळो चौक ते एमईएस चौक दरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने त्यासाठी लागणारे साहित्य अवजड वाहनांतून नेण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: दाबोळी - बोगमाळो चौक ते एमईएस चौक दरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने त्यासाठी लागणारे साहित्य अवजड वाहनांतून नेण्यात येत आहे. तथापी, त्या साहित्यामुळे इतर वाहनांना धोका निर्माण होऊ नये यासाठी कोणतीही खबरदारी घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक, वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.

या उड्डाण पुलाचे बांधकाम सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी महामार्ग वाहतुकीस सहा महिन्यासाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्या मार्गावरील वाहतूक अंतर्गत रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे.

वाहनचालकांच्या जीवितेला धोका, मालमत्तेची हानी होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. तथापी, काही ठिकाणी खबरदारी फक्त देखावा असल्याचे दिसून येते. या उड्डाण पुलासाठी लागणारे साहित्य वाहून नेताना कोणतीही खबरदारी घेण्यात येत नाही.

दोन दिवसांपूर्वी अवजड वाहनांतून मोठ्या प्रमाणात लोखंडी सळ्या नेताना एक दोन सळ्या त्या वाहनाबाहेर आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Purvaja Verlekar: गोव्याच्या 'पूर्वजा'ने घडवला इतिहास! आंतरविभागीय स्पर्धेत ठोकले शतक; बनली पहिली महिला क्रिकेटपटू

Goa Dairy Milk Price: 'दूध खरेदी दरात वाढ करा, अन्यथा आंदोलन'! उत्पादकांचा इशारा; गोवा डेअरीला दिले निवेदन

"रवी नाईक यांनी शिमगोत्सव सर्वांपर्यंत पोचवला"! CM सावंत रमले आठवणीत; स्वच्छ गोवा ठेवण्याचे केले आवाहन

Goa Tourism: पर्यटनात गोव्याला मिळाला दुहेरी मुकूट! गोवा ‘डेस्टिनेशन ऑफ द इयर’; खंवटे ‘टुरिझम मिनिस्‍टर ऑफ द इयर’

Goa Education: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! गोव्यात लागू होणार ‘त्रिसूत्री भाषा’ पद्धत; ‘नापास नाही’ पद्धत राहणार कायम

SCROLL FOR NEXT