Dabolim airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim airport: दाबोळी विमानतळावरील गोदामात शॉर्टसर्किटमुळे आग, काम पूर्ववत; टर्मिनल काही वेळ ठेवली बंद

Dabolim airport warehouse fire: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अरायव्हल गेट-२ च्या गोदामामध्ये (स्टोअर रूम) शॉट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने विमानतळावरील सर्व टर्मिनल काही वेळ बंद ठेवण्यात आले होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अरायव्हल गेट-२ च्या गोदामामध्ये (स्टोअर रूम) शॉट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने विमानतळावरील सर्व टर्मिनल काही वेळ बंद ठेवण्यात आले होते.

आग आटोक्यात आणल्यानंतर काही वेळाने सर्व टर्मिनल सर्वसामान्यांना खुली करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणामार्फत सांगण्यात आले. गोदामात लागलेली आग विमानतळावरील कामगारांनी आटोक्यात आणली. आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली नसली तरी स्टोअर रूममधील सर्व विजेचे साहित्य जळून खाक झाले.

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवार (ता. ११) रोजी सकाळी ११.३० वाजता विमानतळाच्या स्टोअर रूममध्ये आग लागल्याने एकच तारांबळ उडाली. विमानतळावर विजेचे साहित्य ठेवणाऱ्या स्टोअर रूममध्ये शॉट सर्किटमुळे आग लागली. आग लागताच विमानतळावर कामावर असलेल्या कामगारांनी त्वरित नियंत्रण आणले.

कर्मचाऱ्यांची तत्परता

कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आग इतरत्र पसरली नाही. अन्यथा, मोठी दुर्घटना घडली असती. कर्मचाऱ्यांच्या या प्रसंगावधानाबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Road Accident: 'काळापुढे कुणाचे चालत नाही?' अकाली मृत्यूंच्या मालिकेनं हादरला 'गोवा'!

Lucky Zodiac Signs: निर्जला एकादशीला जुळून येतोय 'द्विद्वादश' आणि 'नवपंचम' योग, 'या' 4 राशींच्या नशिबात होणार सुवर्णबदल; गुंतवणुकीतून होणार पैशांचा पाऊस

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

SCROLL FOR NEXT