Dabolim Airport police additional space update Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ पोलिसांना आता मिळणार अतिरिक्त जागा, मानवाधिकार आयोगाकडून महत्त्वपूर्ण आदेश जारी

Dabolim Airport Police Station Space Order: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असलेल्या पोलिस आणि वाहतूक कक्षाच्या दयनीय अवस्थेची दखल घेत, गोवा मानवाधिकार आयोगाने एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असलेल्या पोलिस आणि वाहतूक कक्षाच्या दयनीय अवस्थेची दखल घेत, गोवा मानवाधिकार आयोगाने एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे.

विमानतळ संचालकांनी पोलिस महासंचालकांना सध्याच्या प्रस्तावाव्यतिरिक्त आणखी १२१.६ चौरस मीटर अतिरिक्त जागा हस्तांतरित करावी, असे निर्देश आयोगाने दिले आहेत. यामुळे पोलिस ठाण्यासाठी एकूण ३११.६ चौरस मीटर जागा उपलब्ध होईल.

याची आयोगाने स्वेच्छादखल घेतली होती. गेली अनेक वर्षे हे पोलिस ठाणे १८२ चौरस मीटरच्या ‘पोर्टा कॅबिन्स’मध्ये (तात्पुरते शेड) अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालवले जात आहे.

आयोगाने यापूर्वी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मल्टी-लेव्हल कार पार्किंग इमारतीच्या तळघरातील १९० चौरस मीटर जागा पोलिसांना देण्याची शिफारस केली होती. मात्र, पोलिस महासंचालकांनी दाखल केलेल्या पुनर्विलोकन अर्जावर विचार केल्यानंतर आणि १३ मार्च २०२६ रोजी केलेल्या प्रत्यक्ष स्थळ पाहणीनंतर, आयोगाने ही जागा अपुरी असल्याचे मान्य केले.

पोलिस महासंचालकांवर जबाबदारी : नवीन जागा ताब्यात मिळाल्यानंतर तिथे पोलिस ठाणे आणि वाहतूक कक्षासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी पोलिस महासंचालकांवर सोपवण्यात आली आहे. विमानतळ संचालकांनी या आदेशावर काय कार्यवाही केली, याचा अहवाल २३ जून २०२६ पर्यंत आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Road Accident: 'काळापुढे कुणाचे चालत नाही?' अकाली मृत्यूंच्या मालिकेनं हादरला 'गोवा'!

Lucky Zodiac Signs: निर्जला एकादशीला जुळून येतोय 'द्विद्वादश' आणि 'नवपंचम' योग, 'या' 4 राशींच्या नशिबात होणार सुवर्णबदल; गुंतवणुकीतून होणार पैशांचा पाऊस

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

SCROLL FOR NEXT