Dabolim Airport 84 flights daily Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ भक्कम स्थितीत! दररोज 84 विमानांची ये-जा, 13 हजार प्रवाशांची हाताळणी; विमानतळाला 137 कोटींचा नफा

Dabolim Airport passenger traffic: दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या दररोज सुमारे १३ हजार प्रवाशांची हाताळणी करीत असून, दिवसाला ८० ते ८४ विमानांची ये-जा होत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या दररोज सुमारे १३ हजार प्रवाशांची हाताळणी करीत असून, दिवसाला ८० ते ८४ विमानांची ये-जा होत आहे. प्रवासीसंख्या आणि विमानफेऱ्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने दाबोळी विमानतळाची आर्थिक स्थितीही भक्कम असून, विमानतळाला सध्या सुमारे १३५ ते १३७ कोटी रुपयांचा नफा होत असल्याची माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) दाबोळी विमानतळ संचालक फ्लाइट लेफ्टनंट आकाश दीप यांनी दिली.

दाबोळीवरील प्रवासी संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे वृत्त ‘गोमन्तक’ने दिले. त्या पार्श्वभूमीवर दीप माध्यमांशी बोलत होते. दाबोळी विमानतळावरील सध्याच्या विमान वाहतुकीबाबत माहिती देताना आकाश दीप यांनी सांगितले की, विमानतळावर दररोज सुमारे १३ हजार प्रवाशांची ये-जा होत आहे. त्यासाठी दररोज ८० ते ८४ विमानांच्या फेऱ्या होत आहेत. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर आगामी हिवाळी वेळापत्रकात विमानसेवांमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

हिवाळी वेळापत्रकात सुमारे दहा अतिरिक्त विमानफेऱ्या दर आठवड्याला वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात दाबोळी विमानतळावरील विमान वाहतूक आणि प्रवासीसंख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीची सेवाही लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याचे दीप यांनी सांगितले.

१३५ कोटी रुपयांचा नफा

प्रवासी हाताळणीबरोबरच विमानतळाच्या आर्थिक कामगिरीतही दाबोळीने समाधानकारक स्थिती कायम ठेवली आहे. सध्या विमानतळाला सुमारे १३५ ते १३७ कोटी रुपयांचा नफा होत असल्याचे आकाश दीप यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वाढती विमान वाहतूक, प्रवासीसंख्या आणि नव्या विमान कंपन्यांच्या सेवांमुळे दाबोळी विमानतळाचे महत्त्व कायम असल्याचे चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

Indian Super League: चेन्नईयीनचा विजय एफसी गोव्याने हिरावला; फातोर्ड्यात सामना 1-1 गोलबरोबरीत

Marathi Language: मराठीच्या नावाने गर्दी नको, गुणवत्तेची लाट हवी! भाषा टिकवण्यासाठी पाच धोरणात्मक बदलांची गरज

Wisdom of the Fourth Tree: तीन झाडांचा अहंकार मोडला, चौथं झाड मात्र आनंदात जगलं; आयुष्याचा मोठा धडा शिकवणारी गोष्ट!

Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

SCROLL FOR NEXT