Goa Beach Shacks: गोव्याच्या 'शॅक कायद्या'च्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान; पर्यावरणाला धोका असल्याचा दावा, हायकोर्टाची सरकारला नोटीस

Goa Shack Law 2024: पर्यावरणप्रेमी डेस्मंड आल्वारिस, जेरेमी फेरेरा, कोलवा सिव्हिक फोरम व स्वप्नेश शेर्लेकर यांची ही याचिका आहे.
Goa beach shack law constitutional validity
Goa shack law Bombay High CourtDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा सरकारच्या ‘गोवा एरक्शन ऑफ शॅक्स ऑन पब्लिक बीच (रेग्युलेशन ॲण्ड कंट्रोल) ॲक्ट, २०२४’ या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दखल घेतली आहे.

तसेच राज्य सरकारसह जीसीझेडएमए, पर्यटन विभाग, गोवा पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, नगरनियोजन विभाग, गोवा राज्य जैवविविधता मंडळ, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ व इतर प्रतिवादींना नोटीस जारी केली आहे. पर्यावरणप्रेमी डेस्मंड आल्वारिस, जेरेमी फेरेरा, कोलवा सिव्हिक फोरम व स्वप्नेश शेर्लेकर यांची ही याचिका आहे.

Goa beach shack law constitutional validity
Goa Dairy: गोवा डेअरीचे व्यवस्थापन 'NDDB'कडेच राहणार? हायकोर्टाचे निर्देश; सर्व निर्णय आणि सामंजस्य कराराचे प्रतिज्ञापत्र सादर करा

वाळू उत्खननाची चौकशी व्हावी!

याचिकाकर्त्यांनी २०२४ चा शॅक कायदा असंवैधानिक आणि रद्दबातल ठरवण्याची मागणी केली आहे. तसेच ''सीआरझेड २०११'' नियमांची कडक अंमलबजावणी करणे, किनारपट्टीचे सर्वेक्षण करणे, हणजूणमधील सर्व्हे क्र. ३५४/१ ची परवानगी रद्द करून बेकायदेशीर वाळू उत्खननाची चौकशी करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. शिवाय, या कायद्याच्या अंमलबजावणीला व बांधकामाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रपतींची मंजुरी आवश्‍यक

पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संरक्षण हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे विषय आहेत. त्यामुळे राज्य सरकारला यावर कायदा करण्याचा अधिकार नाही. हा कायदा पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ आणि ''सीआरझेड २०११''च्या अधिसूचनेस थेट छेद देणारा आहे. भारतीय संविधानाच्या कलम २५४(२) नुसार यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी घेणे बंधनकारक असताना ती घेतलेली नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

Goa beach shack law constitutional validity
Ganesh Idol Theft: 'मी विसर्जनासाठी मदत करतो' म्हणत बाप्पा हातात घेतला अन् पोबारा; म्हापशात चांदीच्या दागिन्यांसह गणेशमूर्तीची चोरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com