Daboli Airport Dainik Gomantak
गोवा

Daboli Airport: मोपा सुरू होऊनही दाबोळी सुसाट

गोवा सरकारने मोपा विमानतळ सुरू केल्‍याच्‍या पार्श्वभूमीवर इंधन दर घटवले, त्यामुळे विमान कंपन्‍यांनी गोव्‍याकडे कूच करणे पसंत केले आहे.

दैनिक गोमन्तक

Mopa Airport: मोपा विमानतळ सुरू झाल्‍यानंतर दाबोळीवर विपरीत परिणाम होईल; विमानांचे प्रमाण कमी होऊन आहेत ती मोपाकडे सरकतील, ही भीती अनाठायी ठरली आहे. गोवा सरकारने मोपा विमानतळ सुरू केल्‍याच्‍या पार्श्वभूमीवर ‘एव्‍हिएशन टर्बाईन फ्‍युएल’वरील राज्‍य विक्री कर टक्‍केवारीत 18 वरून 8 टक्‍के अशी घट केल्‍याने अनेक विमान कंपन्‍यांनी गोव्‍याकडे कूच करणे पसंत केले आहे.

तेलंगणा राज्‍याने ‘एव्‍हिएशन फ्‍युएल टर्बाईन’वरील कर 18 वरून 1 टक्‍क्‍यांवर आणल्‍याने तेथे विमानांचे 70 टक्‍के ट्रॅफिक वाढले होते. विमान कंपन्‍यांचा 60 टक्‍के खर्च विमान इंधनाच्‍या करांवरच खर्च होतो.

मोपा सुरू झाल्‍यानंतरही दाबोळी विमानतळावर सध्‍या दिवसाकाठी 80 पेक्षा जादा विमाने उतरत असून, मोपा आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या विमानांची संख्‍या 24 आहे. गेल्‍या वर्षी अपवादात्‍मकदृष्ट्या ‘ऑफ सिजन’मध्‍येही दाबोळीवर दिवसाकाठी 100 पेक्षा अधिक विमाने उतरत होती. हवाई वाहतूक निरीक्षकांनी या घटनेकडे ‘रिव्‍हेन्‍ज टुरिझम’च्‍या अर्थाने पाहिले होते.

कोविडच्‍या काळात सुमारे 2 वर्षे लोक फिरू शकले नव्‍हते. अनेकांना या काळात घरी बंदिस्‍त राहावे लागले. त्‍यामुळे निर्बंध सैल होताच गोव्‍याकडे पर्यटकांची रिघ लागली.

स्वस्त इंधनासाठी गोव्याकडे धाव

यंदा पर्यटन हंगामाच्‍या शेवटच्‍या काळातही (जानेवारी संपत आला तरीही) पर्यटकांची गोव्‍याकडे रिघ लागली आहे. गोव्‍याकडे येणाऱ्या विमानांची संख्‍या कमी झालेली नाही.

विमानतळ सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गोव्‍यात हवाई इंधन दर कमी असल्‍याने अल्‍प दरात इंधन भरून घेण्‍यासाठी अनेक विमान कंपन्‍यांनी गोव्‍याचा मार्ग निवडला आहे.

मोपा ठरणार ‘ग्रोथ इंजिन’

पुढील पर्यटन हंगामात गोव्‍याकडे येणाऱ्या विमानांची संख्‍या किमान 50 टक्‍क्‍यांनी वाढेल, अशी शक्‍यता निरीक्षकांनी व्‍यक्‍त केली आहे. दाबोळीवरील विमानसंख्‍या 100 वरून 70 होईल व मोपावर किमान 80 विमाने उतरतील, असा निरीक्षकांचा अंदाज आहे.

मोपा विमानतळ सुरू झाल्‍यानंतर तेथे नागपूर व जयपूर येथून थेट विमाने सुरू झाल्‍याची माहिती आहे. ‘मोपा’चा फायदा सिंधुदुर्गलाही होणार असल्‍याने दोन राज्‍यांना पर्यटनामुळे उभारी मिळेल. त्‍या दृष्‍टीने मोपा ‘ग्रोथ इंजिन’ म्‍हणून नावारूपाला येण्‍याची शक्‍यता आहे.

निर्णय एक, फायदे अनेक

  • मोपा विमानतळ सुरू झाला तरी दाबोळीवरील विमानसंख्‍या कमी होणार नाही आणि मोपा येथेही नवीन विमाने उतरतील.

  • या काळात इंधन खर्च वाढला तरी गोव्‍यात कर कमी असल्‍याने पर्यटकांना गोव्‍यात येणे परवडू शकते.

  • गोव्‍यात विमानांची ये-जा वाढणार आहे व या मार्गावर नजीकच्‍या काळात जी जोड विमाने होती, ती आता वेगवेगळ्या शहरांकडून गोव्‍यात थेट प्रवास सुरू करतील.

  • त्‍यामध्‍ये रायपूर, अमृतसर व कोची येथून येणाऱ्या विमानांचा समावेश असेल.

  • दुसऱ्या बाजूला मोपा विमानतळ उत्तरेकडच्‍या मोरजी, हरमल, बागा या किनाऱ्यांना निकट असल्‍याने, शिवाय सिंधुदुर्गातही लवकर पोहोचता येणार असल्‍याने मोपावरील विमानसंख्‍या वाढेल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT