Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्‍नी मंत्री, आमदार उदासीन

विधिकार मंचच्या चर्चेकडे पाठ : सत्ताधाऱ्यांनाही जनतेसोबत रस्त्यावर उतरण्याचे आवाहन!
Mahadayi Water Dispute |
Mahadayi Water Dispute | Dainik Gomantak
Published on
Updated on

विधानसभेतील एकदिवसीय चर्चेनंतर म्हादई विषयावर राज्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींसह चर्चात्मक ऊहापोह व्‍हावा, असा निर्णय विधिकार मंचने घेतला होता. त्यानुसार आज चर्चा ठरली होती. मात्र, या चर्चासत्राकडे विद्यमान 90 टक्के आमदारांसह मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

सरकारने या विषयाचा गांभीर्याने पाठपुरावा करावा, असे म्हणत म्हादईचे पाणी वळविण्यास तीव्र विरोध दर्शविणारा ठराव यावेळी संमत करण्यात आला. यावेळी माजी आमदार-खासदार मात्र आक्रमक दिसून आले.

Mahadayi Water Dispute |
Goa Taxi : एक रुपयाही न खर्चता टॅक्सी सेवा सुरु करा, गोवा माईल्स देणार भांडवल

म्हादई विषयावर विधानसभेतही एकदिवसीय पूर्णवेळ चर्चा झाली. मात्र, याबाबत विद्यमान सरकारातील मंत्री, आमदार तसेच माजी आमदार आणि खासदारांची भूमिका काय आहे? हे विचारात घेण्यासाठी गोवा विधिकार मंचने एक दिवसीय चर्चेचे आयोजन केले होते.

यात सभापती रमेश तवडकर, उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्यासह माजी आमदार मोहन आमशेकर, सदानंद मळीक, निर्मला सावंत, व्हिक्टर गोन्साल्विस, माजी खासदार जॉन फर्नांडिस उपस्थित होते.

विधानसभा निलंबित ठेवून घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करणे महत्त्वाचे आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही आता जनतेसह रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे, असे माजी आमदार धर्मा चोडणकर म्हणाले.

पाठपुरावा करा

आज झालेल्या चर्चेत माजी आमदार आणि खासदारांनी या विषयावर चर्चा केली. यावेळी एकूणच सरकार म्‍हादई प्रश्‍नाबाबत गंभीर नाही, असा सूर व्यक्त करण्यात आला. सरकारने यापुढे या विषयाचा गांभीर्याने पाठपुरावा करावा, असे म्हणत पाणी वळविण्यास तीव्र विरोध करणारा ठराव यावेळी संमत करण्यात आला.

‘म्हादई’वरील सुनावणी तातडीने घेण्यास न्यायालय राजी : पांगम

केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक सरकारच्या कळसा-भांडुरा प्रकल्पांच्या सुधारित आराखड्याला दिलेल्या परवानगीबाबत गोवा सरकारकडून घेतलेल्या आक्षेपावर तातडीने सुनावणी घ्यावी, असे पत्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते.

याला न्यायमूर्तींनी सकारात्मक होकार दिला असून पुढील आठवड्यात ही सुनावणी शक्य असल्याची माहिती राज्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.

या पत्रावर आज सर्वोच्च न्यायालयात चर्चा होऊन या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्यात चर्चा होईल आणि या सुनावणीबाबतचा निर्णय राज्य सरकारला आज रात्रीपर्यंत कळेल, अशी माहिती पांगम यांनी दिली आहे.

  • सभापती रमेश तवडकर, उपसभापती जोशुआ डिसोझा हे मंचचे कार्य कारिणी सदस्य वगळता केवळ प्रेमेंद्र शेट आणि अँटोनियो वाझ हे विद्यमान आमदार यावेळी उपस्थित होते.

  • मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, विरोधी पक्षनेते, विद्यमान आमदारांनी या चर्चेकडे पाठ फिरवलीत्यामुळे सत्ताधारी या विषयावर गंभीर नाहीत, अशी बोचरी टीका माजी आमदार नरेश सावळ आणि दयानंद मांद्रेकर यांनी केली.

Mahadayi Water Dispute |
Panjim Smart City : पणजीतील 'ती' सर्व कामे 'या' तारखेनंतर होणार बंद; महापौरांनी घेतला निर्णय

कर्नाटक दुर्योधनासारखे वागते

विधिकार मंचच्या चर्चेत आज माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी म्हादईसंदर्भात कर्नाटककडून होत असलेल्या कारवायांवर चौफेर टीका करत ‘कर्नाटक दुर्योधनासाठी वागत आहे’, असे म्हटले. ज्याप्रमाणे महाभारतात ‘धर्मराजासाठी सुईच्या टोकाएवढीही जमीन देणार नाही’, असे म्हणणारा दुर्योधन आणि कर्नाटक एकसारखेच भूमिका बजावत आहेत, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com