Judo Competition Dainik Gomantak
गोवा

Judo Competition: आंतरमहाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत डीएम्स महाविद्यालयाची बाजी

विद्या प्रबोधिनी महाविद्यालयास उपविजेतेपद, व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालय तिसरे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा विद्यापीठातर्फे (Goa University) घेण्यात आलेल्या महिलांच्या आंतरमहाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत (Judo Cometition) आसगाव-बार्देश येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या (डीएम्स) महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. पर्वरी येथील विद्या प्रबोधिनी महाविद्यालयास उपविजेतेपद, तर मिरामारच्या व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयास तिसरा क्रमांक मिळाला.

स्पर्धा ताळगाव पठार येथील गोवा विद्यापीठाच्या ज्युबिली हॉलमध्ये (Jubilee Hall) झाली. विद्यापीठाचे संगणक केंद्र प्रमुख संजय बांदोडकर, क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या ज्युदो प्रशिक्षक जया पाटील, विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा सहाय्यक संचालक भालचंद्र जदार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू

44 किलो वजनगट: नम्रता कांबळे (डीएम्स-आसगाव)

48 किलो वजनगट: तनिष्का शिवोलकर (नारायण झांट्ये महाविद्यालय-डिचोली)

52 किलो वजनगट: ज्योती यादव (डीएम्स-आसगाव)

57 किलो वजनगट: नेहा नाईक (विद्या प्रबोधिनी-पर्वरी)

63 किलो वजनगटः किनल मयेकर (डीएम्स-आसगाव)

70 किलो वजनगट: रुचा शेट (विद्या प्रबोधिनी-पर्वरी)

78 किलो वजनगट: नेहा गावस (साखळी)

78 वरील वजनगट: इराम खत्री (व्हीएम साळगावकर कायदा-मिरामार).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT