पणजी: गोव्याला (Goa) तिसाव्या राष्ट्रीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत (National Tennis Ball Cricket) मुलांत रौप्यपदक मिळाले. शनिवारी झालेल्या अंतिम लढतीत त्यांना छत्तीसगडविरुद्ध (Chattisgarh) हार पत्करावी लागली. स्पर्धा उत्तराखंडमधील हरिद्वार (Uttrakhand, Haridwar) येथे झाली.
स्पर्धेच्या उपांत्य व अंतिम लढतीस पावसाचा फटका बसला. त्यामुळे सामने प्रत्येकी चार षटकांचे खेळविण्यात आले. गोव्याने उपांत्यपूर्व सामन्यात एआयआयबी संघाला, तर उपांत्य लढतीत राजस्थानला (Rajasthan) हरविले, मात्र अंतिम लढतीत छत्तीसगड संघ भारी ठरला.
अंतिम लढतीत गोव्याने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 23 धावा केल्या. पुनीत खांडेपारकरने सर्वाधिक 10 केल्या, नंतर छत्तीसगडने 3.4 षटकांत 3 बाद 24 धावा करून सामना जिंकला. पुनीत, कन्हैय्या व अक्षदने प्रत्येकी 1 गडी बाद केला. गोव्याच्या कन्हैय्या याला स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज व सर्वोत्कृष्ट झेलासाठी बक्षीस मिळाले.
उपांत्य लढतीत गोव्याने 3 बाद 48 धावा नोंदविल्या. साईश गावडे (15), अक्षद नाईक (10), विजय हळगेकर (08) व हर्ष गाला (10) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. नंतर राजस्थानला 04 बाद 35 धावाच करता आल्या. विजय हळगेकर याने 03, तर पुनीत खांडेपारकरने 01 गडी बाद केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.