Cylinder explosion in Mapusa shop Dainik Gomantak
गोवा

म्हापशातील दुकानात सिलिंडर स्फोट!दुकानमालक जखमी

दुकानातून धुर येत असल्याचे शेजारील दुकानदारांची निदर्शनास आले. दुकानाचे शटर उघडीत असताना आत असलेल्या लहान गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: खोर्ली-म्हापसा येथील श्वेता रेसिडेन्सीमधील ‘भारत मार्केटिंग अ‍ॅण्ड रेफ्रिजरेशन’ या रेफ्रिजरेटर दुरूस्ती दुकानात सिलिंडर स्फोट झाला. या घटनेत अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर दुकानमालक किरकोळ जखमी झाले. सदर घटना काल (गुरुवारी) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली.

म्हापसा अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, शॉटसर्किटमुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुकानात दिवा बत्ती लावली होती. त्यामुळे या दिवाबत्तीमुळेच आग लागण्याची शक्यता अग्निशामक दलाने व्यक्त केली आहे. दुकानातून धुर येत असल्याचे शेजारील दुकानदारांची निदर्शनास आले. लगेच त्यांनी दुकान मालकास बोलावले. दुकानाचे शटर उघडीत असताना आत असलेल्या लहान गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे दुकान मालक सतीश नाईक हे किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारार्थ म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले.

यावेळी सिलिंडर शटरमधून आरपार होत बाहेर फेकला गेला. यातून या स्फोटची धाहकत दिसते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत, अर्जुन धावसकर, विष्णू केसरकर व देवेंद्र नाईक यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेचा पंचनामा पोलिस हवालदार केशव नाईक यांनी केला.

लोकांनी सावधानता बाळगावी...

या सिलिंडर स्फोटामुळे मोठा अनर्थ घडला नसला तरी म्हापशातील प्रत्येकांनी काळजी घ्यायला हवी. दुकानात रात्रीच्यावेळी विद्युत उपकरणे बंद करणे गरजेचे आहे. लोकांनी सावधानता बाळगून आगीसारख्या घटना घडल्यास त्वरित पोलिस व आग्निशामक दलाला कळवावे, असे दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT