Cyclone Remal  Dainik Gomantak
गोवा

Cyclone Remal : रेमल’मुळे मॉन्सूनला वेग; वादळानंतर ठरणार मॉन्सूनची दिशा

Cyclone Remal : ‘रेमल’ चक्रीवादळ तीव्र झाले आहे.रविवारी मध्यरात्री हे वादळ धडकण्याची शक्यता होती. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर किनारी भागांत दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cyclone Remal Update :

बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सूनने रविवारी मजल मारली आहे.

‘रेमल’ चक्रीवादळ तीव्र झाले आहे.रविवारी मध्यरात्री हे वादळ धडकण्याची शक्यता होती. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर किनारी भागांत दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

नैॡत्य बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता. २५) सायंकाळी ‘रेमल’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. रविवारी तीव्र रूप धारण करणारे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या सागर बेटांपासून २१० किलोमीटर, तर कॅनिंगपासून २३० किलोमीटर दक्षिणेकडे उपसागरात घोंघावत होते.

ताशी ९५ ते ११५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणाऱ्या चक्रीवादळाचे केंद्र ताशी १३ किलोमीटर वेगाने जमिनीकडे सरकत होते.

‘वादळानंतर ठरणार मॉन्सूनची दिशा’

वादळी प्रणालीमुळे चाल मिळाल्याने नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वाटचाल कायम ठेवली आहे. रविवारी (ता. २६) बंगालच्या उपसागराच्या मध्य आणि ईशान्य भागात मॉन्सूनने प्रगती केली. वादळी प्रणाली निवळल्यानंतर मॉन्सूनच्या पुढील वाटचालीची दिशा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

SCROLL FOR NEXT