Goa-Pune Flight: दुपारी जाणारी फ्लाइट रात्री सुटली; गोव्याहून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांचा 8 तास खोळंबा!

Goa-Pune Flight: गोव्याहून पुण्याला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या एसजी-184 फ्लाइटमधील प्रवाशांचा खोळंबा झाला.
Goa – Pune SpiceJet flight delayed by 8 hours
Goa – Pune SpiceJet flight delayed by 8 hours

Goa-Pune Flight: गोव्याहून पुण्याला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या एसजी-184 फ्लाइटमधील प्रवाशांचा खोळंबा झाला. सातत्याने फ्लाइटच्या वेळेत बदल झाल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला. फ्लाइटच्या तब्बल आठ तासांच्या विलंबामुळे प्रवाशांचा चांगलाचं खोळंबा झाला. सुरुवतीला मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुपारी 2 वाजता निघणार असलेल्या फ्लाइटने रात्री 11 वाजता उड्डाण केले. त्यामुळे फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या तब्बल 150 हून अधिक प्रवाशांची गैरसोय झाली. दरम्यान, स्पाईसजेटने फ्लाइटला उशीर होणार असल्याचे प्रवाशांना कळवल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, प्रवाशांना यासंबंधीची सूचना देखील दिल्याचा दावा केला. तथापि, अनेक प्रवाशांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या हॉटेलमधून नियोजित वेळेत चेक आउट करावे लागले, ज्यामुळे त्यांना आणखी गैरसोय आणि अतिरिक्त खर्च करावा लागला.

दरम्यान, एका प्रवाशाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "हॉटेलमध्ये परत राहणे महाग प्रकरण ठरले असते कारण आम्हाला अतिरिक्त दिवसासाठी पैसे द्यावे लागले असते." आणखी एका प्रवाशाने सांगितले की, त्याने निनावी राहणे पसंत केले. दोन्ही प्रवाशांनी हायलाइट केले की, त्यांच्या हॉटेलमध्ये चेक-आउटची वेळ दुपारी 12 वाजताची होती.

Goa – Pune SpiceJet flight delayed by 8 hours
SpiceJet New Flights: स्पाइसजेट आजपासून करणार 26 नवीन उड्डाणे सुरू

“मी मूळ वेळापत्रकानुसार फ्लाइट निवडली होती. रीशेड्युलिंग मेसेज मिळाल्यानंतर, मी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी बोललो, परंतु त्यांनी मला कळवले की चेक-आउट केल्यानंतर राहण्यासाठी अतिरिक्त दिवसांसाठी शुल्क आकारले जाईल. त्यामुळे आमच्याकडे हॉटेल सोडण्याशिवाय पर्याय नव्हता,” असेही आणखी एका प्रवाशाने सांगितले.

संध्याकाळी 7:30 वाजता फ्लाइटच्या वेळेत पहिल्यांदा बदल करण्यात आला. तथापि प्रवासी संध्याकाळी 6 वाजता विमानतळावर पोहोचले होते. यादरम्यान बोर्डिंगला आणखी विलंब झाला आणि रात्री 11 वाजेपर्यंत फ्लाइटने उड्डाण केले नाही. एअरलाइनच्या एका सूत्राने सांगितले की, रात्री 8 वाजता सुटण्याच्या प्रवाशांना सूचित करणारा दुसरा मेसेज पाठवण्यात आला होता. असे असतानाही फ्लाइटला उशीर झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली.

Goa – Pune SpiceJet flight delayed by 8 hours
Goa Indore Flight: खराब हवामानाचा फटका! एक तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला

स्पाईसजेटकडून अधिकृत प्रतिसाद अद्याप प्रलंबित असताना, फ्लाइटच्या विलंबामुळे खोळंबा झालेल्या प्रवाशांमध्ये नाराजी पसरली. अनपेक्षित वेळापत्रकातील बदलांमुळे होत असलेल्या खोळंब्याबद्दल प्रवाशांना आगोदर विमान कंपन्यांकडून सांगण्यात यावे, यावर भर दिला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com