Road Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News : ट्रकच्या धडकेने दाबोळीत सायकलस्वार ठार; पणजीत हिट ॲण्ड रन

पणजीत हिट ॲण्ड रन प्रकरणात पादचाऱ्याचा जागीच मृत्यु

दैनिक गोमन्तक डिजिटल

दाबोळी येथील मुख्य सिग्नलसमोर एका सिमेंट कॉंक्रिटवाहू ट्रकने सायकलस्वाराला धडक दिल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला.

बायणा येथे सिमेंट कॉंक्रिट घालून पुन्हा कुठ्ठाळी - साकवाळकडे जात असताना या ट्रकने सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. त्यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला.

शनिवारी (ता.8) सायंकाळी 5.45 वाजता दाबोळी राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य सिग्नलजवळ सिमेंट कॉंक्रिटवाहू ट्रकची (जीए07- एफ-7155) जोरदार धडक बसल्याने सायकलस्वार खर्क प्रसाद भरदु जैशी (वय 44वर्षे, मूळ रा. महाराष्ट्र) याचा अपघातात जागीच मृत्यू झाला.

हा ट्रक दाबोळी विमानतळमार्गे साकवाळकडे जात होता, तर सायकलस्वार बोगमाळो येथून मुख्य रस्त्यावरून वेर्णाला जाण्याच्या तयारीत होता. याचवेळी सिग्नलजवळ ट्रकने ठोकरल्याने तो ट्रकखाली सापडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

पणजीत हिट ॲण्ड रन

हिरा पेट्रोल पंपजवळ काल पहाटे कारच्या धडकेत मनोज श्रीधरन हा पादचारी जागीच ठार झाला. या परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिस तपासात अडचणी येत आहेत.

पोलिसांनी इतर बाजूंनी तपास सुरू केला असून या ‘हिट ॲण्ड रन’ केसचा लवकरच छडा लावला जाईल, असे पणजी पोलिसांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT