Valpoi News  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : त्‍यांनी’ आपला तरुणपणीचा सायकल प्रवास बनवला यादगार!

गोमन्तक डिजिटल टीम

पद्माकर केळकर

पूर्वीच्‍या काळात ग्रामीण भागात दळणवळणाची साधने नव्हती. कच्चा रस्त्याने पायपीट करावी लागत असे. क्वचितच काही लोकांकडे सायकल असायची. सत्तरी तालुक्यातील माणसे तर ध्येय वेडी. एखादी गोष्ट मनात घट्ट केली ती परिपूर्ण होईपर्यंत गप्प बसणे नाही. अशीच नगरगाव येथील काही युवकांनी त्याकाळी कारवार, गोकर्ण, बेळगाव, मालवण असा प्रवास चक्क सायकलने केला होता. त्या आठवणी आजही ताज्या आहेत.

नगरगावचे गजानन वझे, संदीप जोशी, महेश जोशी, प्रसाद जोशी, सुधीर दामले व वाळपईचे विजय चिपळूणकर या सहा जणांनी मोठे धारिष्ट दाखवून सायकने प्रवास केला होता. 1987, 1988, 1989 अशी सलग तीन वर्षे गोकर्ण, कारवार, बेळगाव, मालवण असा मोठ्या पल्याचा प्रवास त्‍यांनी केला. याची आठवण सांगताना गजानन वझे म्हणाले की, आमचा तो सायकल प्रवास कायम स्‍मरणात राहिला. प्रवास करणे हे प्रत्येक माणसाच्या जीवनातील एक स्‍वप्‍न असते.

आमच्यापूर्वी बांबर गावचे विष्णुपंत जोशी, जयंत बर्वे व इतर काही जणांनी थेट कन्याकुमारीपर्यंत तसेच पुण्‍यापर्यंत सायकलने प्रवास केला होता. त्‍यांच्‍याकडून अनुभव गोळा केला. मग १९८७च्या डिसेंबरमध्ये नाताळच्या सुट्टीत माझ्‍यासह विजय, प्रसाद, संदीप, सुधीर व महेश यांनी बेळगावाचा प्‍लॅन आखला. आम्‍ही सर्वजण 15 ते 25 वर्षे वयोगटातील होतो, असे वझे म्‍हणाले. संपूर्ण कच्चा रस्ता व डिसेंबरचे ऊन यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. सकाळचा उत्साह संध्‍याकाळी मावळायला आला होता. पण एकदाची आमची वारी किणयेला पोहोचली व मग पक्का रस्ता लागला. साडेपाच-सहा वाजता बेळगावला पोहोचलो, असेही ते म्‍हणाले.

रात्रीचे जेवण हॉटेलवर घेऊन आमची क्षुधा शांत केली. दिवसभरच्या प्रवासाने थकलेले आम्ही सर्वजण केव्हा झोपलो हे कुणाला कळले नाही. दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरू झाला.

सुट्टी पडली की पडायची प्रवासाची स्‍वप्‍नं

आमचा सायकल प्रवास सन 1987 ते 1989 असा तीन वर्षाचा आहे. दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी पडली की आम्हालाही सायकल प्रवासाची स्वप्ने पडू लागायची. त्यावेळी चोर्ला घाट रस्ता हा नवीनच तयार झाला होता. त्यावेळी आम्ही सायकलने प्रथम चोर्ला घाट रस्ता बघायला गेलो होतो.

तिथे बेळगाव ५५ किलोमीटर असा बोर्ड लिहिलेला होता. तो वाचून आमच्या ग्रुपला व आमच्या उत्साहाला उधाण आले व आम्ही असा मनसुबा रचला की आता थेट बेळगावपर्यंत मजल मारायची, असे वझे म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT