cycling in goa Dainik Gomantak
गोवा

Cycling In Goa: पुण्यातील 72 वर्षीय 'तरुणांचा' 800 किमी सायकल प्रवास

जनजागृतीचा उद्देश : 14 दिवसांत कापले 800 किमी अंतर

गोमन्तक डिजिटल टीम

अनिल पाटील

रोगमुक्त आणि तंदुरुस्त राहण्याबरोबर निसर्गाच्या जवळ जाण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे सायकल चालवणे होय. सायकल चालवण्याच्या छंदासाठी विशेष काही खर्चही येत नाही आणि प्रदूषणही होत नाही. म्हणून सर्वांनी दिवसाकाठी 30 ते 40 किलोमीटर सायकल चालवलीच पाहिजे, असे मत मुकुंद कडुसकर यांनी मांडले आहे.

72 वर्षीय कडूसकर आपल्याच वयाच्या जयंत रिसबूड या मित्राला घेऊन पुण्यावरून कराड, कोल्हापूर, कोकणचा आस्वाद घेत 14 दिवसांत 793 किलोमीटरचा प्रवास करून गोव्यात पोहोचले आहेत. निवृत्तीनंतर आराम करत देवदर्शन करत आयुष्य जगण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, ही मानसिकता बाजूला सारत समाजाच्या प्रति आपण काहीतरी देणे लागतो, ही धारणा मनात ठेवून या वयात तरुणांना लाजवेल, असा सायकल प्रवास करत ही मंडळी सफर करत आहेत.

सह्याद्रीच्या कुशीतील लोक प्रेमळ-

सह्याद्री हा जागतिक वारसा स्थळ आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जल, पाणी, आणि वायू प्रदूषण कमी केले पाहिजे. यासाठी सायकलचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, असे सांगत कडूसकर म्हणाले, आम्हाला प्रवासामध्ये भेटलेली माणसे ही इथल्या निसर्गाप्रमाणेच रसाळ गोमटी, माणुसकीवर प्रेम करणारी आहेत, याचा अनुभव आला, असे त्यांनी सांगितले.

गडकिल्ल्यांवर भ्रमंती: अबूधाबीमधील प्रिंटिंग प्रेस कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर कडूसकर पुण्यात स्थायिक झाले. त्यांना लहानपणापासूनच सायकलींगचा छंद होता. पुण्यात त्यांना कमिन्समधून निवृत्त झालेले सायकलवेडे रिसबूड भेटले. मग दोघांची घट्ट मैत्री झाली आणि सुरू झाली गडकिल्ल्यांवर सायकल भ्रमंती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सोशल मीडियावर सरकारी नोकरीचे आमिष! गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या नावानं भरतीची बनावट जाहिरात, सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Srinivas Naik Firing Case: पर्वरी गोळीबार प्रकरण: थिवी येथे पिस्तूल, जीवंत काडतूस जप्त; संशयितांवरील फास आणखी घट्ट

Viswajit Rane Delhi visit: मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली अमित शहांची भेट, दिल्लीत बी. एल. संतोष, भूपेंद्र यादव यांच्याशीही चर्चा

Terrorist Hafiz Saeed: हाफिज सईदवर कधी कारवाई होणार? पत्रकाराच्या जळजळीत प्रश्नावर पाकिस्तानी PMची लाजिरवाणी पळापळ; भारताचा सज्जड दम ठरला खरा VIDEO

Health And Motor Insurance Price Cut: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! स्वस्त होणार हेल्थ आणि मोटर इन्शुरन्स; अवाजवी कमिशनला लागणार लवकरच ब्रेक

SCROLL FOR NEXT