Goa Government Websites Cyber Attack Dainik Gomantak
गोवा

Goa News: धक्कादायक! गोव्यातील 62 सरकारी संकेतस्थळांवर सायबर हल्ला! दिसू लागल्या कॅसिनोच्या जाहिराती

Goa Government Websites Cyber Attack: राज्यातील एकूण ६२ सरकारी खात्यांच्या संकेतस्थळांवर सायबर हल्ला झाला असून हा हल्ला एका अधिकृत सरकारी संकेतस्थळाच्या होस्ट सर्व्हरवर झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील एकूण ६२ सरकारी खात्यांच्या संकेतस्थळांवर सायबर हल्ला झाला असून हा हल्ला एका अधिकृत सरकारी संकेतस्थळाच्या होस्ट सर्व्हरवर झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

या सायबर हल्ल्यामुळे काही शासकीय संकेतस्थळांवर अनुचित मजकूर, जसे की कॅसिनोच्या जाहिराती दिसू लागल्या. महिला आणि बालविकास विभागाच्या संकेतस्थळावरही अशाच प्रकारचा मजकूर दिसून आला.

राणे यांनी स्पष्ट केले की, महिला बालकल्याण संकेतस्थळाकडे वैध वेबसुरक्षा ऑडिट प्रमाणपत्र आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून ते सध्या अक्षम केले आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. ‘हा प्रकार पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि सार्वजनिक डिजिटल सेवांची विश्वासार्हता कमी करणारा आहे. यामध्ये कठोर जबाबदारी निश्चित केली जाईल,’ असेही राणे म्हणाले.

विशेष म्हणजे, आठ महिन्यांपूर्वीही गोवा सरकारच्या अनेक संकेतस्थळांवर अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला होता. भारतातील अनेक शासकीय संकेतस्थळे सायबर गुन्हेगारांनी लक्ष्य केली असून, योजनांशी व शिष्यवृत्तींशी संबंधित दुव्यांवर ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती लावल्या आहेत. अगदी विद्यापीठ अनुदान आयोगाचे संकेतस्थळही अशा प्रकारच्या हल्ल्याचा बळी ठरले आहे.

व्यापक सुरक्षेकडे दुर्लक्ष

माध्यमांमध्ये केवळ महिला व बालकल्याण विभागाच्या संकेतस्थळावरच लक्ष केंद्रित करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना मंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले, की ‘या सायबर हल्ल्यामुळे ६२ शासकीय संकेतस्थळे बाधित झाली आहेत, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मात्र, केवळ महिला व बालविकास विभागाच्या संकेतस्थळाचीच वारंवार नोंद घेतली जात आहे. त्यामुळे या घटनेचे संपूर्ण चित्र विकृत होते आणि व्यापक सायबर सुरक्षेच्या समस्येकडे दुर्लक्ष होते, हे योग्य नाही.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT