Students  Dainik Gomantak
गोवा

पोलिसांसाठी विद्यार्थी ‘सायबर वॉरियर्स’

उपअधीक्षक शिवेंदू भूषण : डिचोली रोटरी क्लबतर्फे जनजागृती कार्यशाळा

दैनिक गोमन्तक

पणजी : देशात तसेच जगभरात सायबर गुन्हे झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे अतिशय महत्वाचे आहे. गोवा पोलिसांसाठी शालेय विद्यार्थी सायबर वॉरियर्स आहेत. ते पोलिसांना या कामात मदत करू शकतात. त्यासाठी गोव्याच्या सर्व भागांमध्ये असे अनेक जनजागृती कार्यक्रम या कक्षातर्फे आयोजित करण्यात येतील, अशी माहिती आयपीएस शिवेंदू भूषण यांनी दिली.

सायबर गुन्हे व सायबर सुरक्षा या विषयावर रोटरी क्लब ऑफ डिचोली यांनी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या संयुक्त विद्यमाने डिचोली व आसपासच्या गावातील शाळांमधील विद्यार्थिनींसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. व्यासपीठावर मडगावचे पोलिस उपअधीक्षक तथा व सायबर गुन्हेचे उपअधीक्षक शिवेंदू भूषण, मंगळुरू येथील सायबर सुरक्षातज्ज्ञ डॉ. अनंत प्रभू व सायबर कक्षाचे पोलिस निरीक्षक राहुल परब उपस्थित होते.

यावेळी उपअधीक्षक शिवेंदू भूषण व सायबर गुन्हे पोलिस स्थानकाचे निरीक्षक राहुल परब यांनी गोव्यात घडलेल्या सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार कारवाईची माहिती दिली. सुदिन नायक यांनी स्वागत करून आभार मानले.

डॉ. अनंत प्रभू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सायबर गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरताना करावयाच्या आवश्यक उपाययोजना याविषयी तपशीलवार माहिती दिली. तसेच सायबर गुन्हे माहितीसाठी सरकारी हेल्पलाईनची माहिती दिली. सोशल मीडियाचा वापर जपूनच व्हायला हवा,असे आवाहनही डाॅ. प्रभू यांनी विद्यार्थ्यांना यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT