Uttar Pradesh Police 
गोवा

42 मोबाईल, 27 सिम कार्ड, 8 लॅपटॉप, 83 एटीएम कार्ड, 38 बँक पासबुक जप्त; Telegram द्वारे फसवणूक करणाऱ्या तिघांना गोव्यातून अटक

Goa Crime News: गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांची सुमारे ९.५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सुमितने दिली होती.

Pramod Yadav

उत्तर प्रदेश: गोव्यातून टेलिग्राम अ‍ॅपद्वारे फसवणूक करणाऱ्या तिघांना फर्रुखाबाद पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ४२ मोबाईल, २७ सिम कार्ड, ८ लॅपटॉप, ८३ एटीएम कार्ड, ३८ बँक पासबुक आणि इतर अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. ही आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता असून, त्यांचा अनेक राज्यांशी संबंध असू शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संजय सिंह यांनी फतेहगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत कारवाईची माहिती दिली. सुमित कुमार (रा. चाचुपूर) याने याप्रकरणी फतेहगड येथील सायबर गुन्हे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांची सुमारे ९.५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सुमितने दिली होती. तपासादरम्यान, संशयास्पद खात्यांचे तपशील, आरोपींचे कॉल डिटेल्स आणि लोकेशनच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रल्हाद भाई ठक्कर (३५), वीरेन बाबू भाई पटेल (४५) आणि उमंग हितेश भाई पटेल (२५) यांना गोव्यातून अटक करण्यात आलीय. सर्व संशयित गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर गावचे रहिवासी आहेत.

संशयितांकडून ४२ मोबाईल, ८३ एटीएम कार्ड, २७ सिम कार्ड, ८ लॅपटॉप, बँकांचे तीन क्यूआर कोड, चार इंटरनेट राउटर, डिजिसोल कंपनीचे लॅन कनेक्टर, वेगवेगळ्या बँकांचे ३७ चेकबुक, ३८ पासबुक, ५८ बँक किट जप्त करण्यात आले आहे.

तक्रारदाराला टेलिग्राम अॅपद्वारे पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले होते. त्याची सुमारे ९,५२,३३४ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. टेलिग्राम अॅपद्वारे नागरिकांना संपर्क साधून त्यांना गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केली जात होती.

सुरुवातील संबधित व्यक्तीला काही प्रमाणात नफा देखील दिला जात असे, दरम्यान, मोठी रक्कम गुंतवल्यानंतर फसवणूक केली जायची, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

Goa Politics: ठरलं! दिगंबर कामत, रमेश तवडकर होणार मंत्री; गुरुवारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

Goa Minister Resigned: पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा राजीनामा; गुरुवारी तवडकर, कामत घेणार शपथ

Asia Cup 2025: ‘...काही फरक पडत नाही’, भारत-पाकिस्तान सामन्यावर वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य; पाहा काय म्हणाले VIDEO

Viral Video: ‘डिग्रीची किंमत घटली...’! फिरायच्या नादापायी केलं ट्रक ड्रायव्हरसोबत लग्न; महिलेचा अतरंगी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT