Ahmedabad Plane Crash: तो म्हणाला, ''माझ्या प्रेमाची वाट पाहतोय'' विमान अपघातात प्रेयसी गेली; डोळ्यांत पाणी आणणारा Video

Emotional Video Plane Crash: एक कहाणी सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होतेय ती म्हणजे आपल्या प्रेयसीला गमावलेल्या एका तरुणाच्या दुःखाची ज्याचा आक्रोश अनेकांना हेलावून सोडतोय
viral video Ahmedabad crash
viral video Ahmedabad crashDainik Gomantak
Published on
Updated on

अहमदाबाद: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. या दुर्घटनेत अनेकांनी आपले जवळचे गमावले असून, त्यांच्यासोबतच्या शेवटच्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिलत. अशा अनेक हृदयद्रावक कथा या अपघातानंतर समोर येत आहेत, ज्या ऐकून मन सुन्न होतंय. यापैकीच एक कहाणी सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होतेय ती म्हणजे आपल्या प्रेयसीला गमावलेल्या एका तरुणाच्या दुःखाची, ज्याचा आक्रोश अनेकांना हेलावून सोडतोय.

अपघाताचे भीषण वास्तव आणि मृतांचा वाढता आकडा

एअर इंडियाचे अहमदाबाद-लंडन विमान कोसळल्याने झालेल्या या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह विमानातील २२९ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स यांचा दुर्दैवी अंत झाला. याव्यतिरिक्त, विमान ज्या वैद्यकीय वसतिगृहावर आदळले, तेथील ३३ निष्पाप व्यक्तींनाही जीव गमवावा लागला. त्यामुळे या दुर्घटनेतील एकूण मृतांचा आकडा २७४ पर्यंत पोहोचल्याने या घटनेची भीषणता अधोरेखित होते.

'माझ्या प्रेमाची': एका तरुणाच्या वेदनेचा हुंकार

न्यूज द ट्रुथचे पत्रकार तमाल सहा यांनी अपघातानंतरच्या परिस्थितीचे वर्णन करताना एका हृदयद्रावक प्रसंगाची नोंद केली. हॉस्पिटलच्या प्रतीक्षा कक्षात त्यांना एक तरुण भेटला, जो त्याच्या प्रेयसीच्या पार्थिवाची वाट पाहत होता. सहा यांनी सांगितले की, "तो तरुण तिथे शांतपणे बसून एकटाच रडत होता. त्याने त्याची प्रेयसी गमावली होती. त्याच्या बाजूला कोणीही नव्हते, तो फक्त आठवणींमध्ये हरवला होता, आता त्या आठवणींसोबतच त्याला आयुष्यभर जगायचं आहे."

सहा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात तो तरुण दुःखाने व्याकुळ झालेला दिसतोय आणि एक व्यक्ती त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत आहे.

viral video Ahmedabad crash
Ahmedabad Plane Crash: ब्लॅक बॉक्समधून विमानाचे इंजिन, वेग यांबाबत माहिती मिळणार; अहमदाबाद दुर्घटनेचा अंतिम अहवाल 6 महिन्यांनी

जेव्हा त्या तरुणाला "कोणाची वाट बघत आहात?" असे विचारले, तेव्हा त्याने डोळ्यात अश्रू आणत फक्त दोन शब्दांत उत्तर दिले, "माझ्या प्रेमाची." बातमी मिळताच तो मुंबईहून धावत आल्याचेही सहा यांनी नमूद केलं.

या घटनेनंतर समाजमाध्यमांवर प्रचंड भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटिझन्स या व्हिडिओला 'हृदय पिळवटून टाकणारा' आणि 'मनाला चटका लावणारा' प्रसंग म्हणताय. "हे सर्व पाहणे असह्य आहे," अशी भावना एका युजरने व्यक्त केली. "हे दृश्य मन हादरवणारं आहे. देवा त्याला हे दुःख सहन करण्याची ताकद दे" अशी प्रार्थना करत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या दुर्घटनेने अनेकांच्या जीवनात जी पोकळी निर्माण केली आहे, ती भरून निघणं खरोखरच कठीण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com