Mopa Airport: अहमदाबाद दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर 'मोपा'वर आतापासूनच काळजी घेणे आवश्यक, ‘फनेल झोन’बाबत नियोजनाची गरज

Mopa Area Development: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उत्तर गोव्यातील मोपा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून या परिसरात औद्योगिक व निवासी धोरणांचे जाळे विणले जात आहे.
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak
Published on
Updated on

धारगळ: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उत्तर गोव्यातील मोपा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून या परिसरात औद्योगिक व निवासी धोरणांचे जाळे विणले जात आहे. विविध खासगी कंपन्यांच्या आणि व्यक्तींच्या इमारती, हॉटेल्स व वसाहतींच्या प्रस्तावांना वेग आला आहे. मात्र, या विकासाच्या गराड्यात विमानतळाच्या सुरक्षेला गालबोट लागू नये याची दक्षता घेणे अत्यावश्यक ठरणार आहे.

विमान उड्डाणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘फनेल झोन’मध्ये कोणतीही उंच बांधकामे होऊ नयेत, अशी स्पष्ट अट नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने घालून दिली आहे. ‘फनेल झोन’ म्हणजे विमान उड्डाण किंवा लँडिंग करताना ज्या दिशेने विमान सरकते त्या मार्गावर, ठरावीक कोन आणि अंतराच्या पट्ट्यातील क्षेत्र. या झोनमध्ये अतिउंच इमारती, टॉवर्स किंवा अडथळा ठरणारी कोणतीही रचना निषिद्ध मानली जाते.

सध्या मोपा परिसरात सुरू असलेला विकास पाहता भविष्यात ‘फनेल झोन’च्या मर्यादा ओलांडून उंच इमारती उभ्या राहण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे विमानाच्या सुरक्षेवर आणि उड्डाणव्यवस्थेवर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच, आतापासूनच काळजी घेत, विकास आराखड्यात ‘फनेल झोन’चे नियम स्पष्टपणे अंतर्भूत करणे आवश्यक आहे.

यासंदर्भात मोपा विकास प्राधिकरणावर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. प्राधिकरणाने विमानतळाच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन सर्व प्रस्तावित इमारतींचे परीक्षण करणे, तसेच बांधकाम परवाने देताना फनेल झोनचे निकष काटेकोरपणे लागू करणे अपेक्षित आहे. केवळ विकासाच्या नावाखाली विमान वाहतुकीचा धोका पत्करणे योग्य ठरणार नाही.

‘फनेल झोन’मध्ये तरी उंच इमारती नकोत!

अहमदाबाद येथे विमान विमानतळ परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलवर पडल्यानंतर विमानतळ परिसरातील इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेला आला आहे. निदान फनेल झोनमध्ये उंच इमारती नको, या नियमांचे पालन करण्याची गरज यातून अधोरेखित झाली आहे. दाबोळी विमानतळाचा फनेल झोन व परिसर यातील उंच इमारतींचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

विमानतळ म्हटले की, डोळ्यांसमोर येतो तो प्रचंड क्षेत्रफळ असलेला पट्टा, धावपट्टीवरून उसळी मारणारी विमाने आणि त्यांच्यातील अचूक वेळेचा खेळ; पण या सर्वांच्या पलीकडे एक महत्त्वाचा भाग असतो ‘फनेल झोन’. हा भाग विमानतळाच्या आजूबाजूला असतो; पण त्याचे महत्त्व आणि त्यावरील निर्बंध अनेकदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत.

अंमलबजावणी कोण करतो?

भारतीय विमानतळ प्राधिकरण विमानतळ व्यवस्थापन आणि फनेल झोन संबंधित परवानग्या देणारी प्रमुख संस्था आहे. भारतीय नागरी उड्डाण महासंचालनालय नियम आखते आणि अंमलबजावणीची जबाबदारी ठेवते. स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका किंवा पंचायत संस्थांनी इमारत बांधकाम परवानग्या देताना भारतीय विमान प्राधिकरणाकडून ना हरकत दाखला आहे का, याची खातरजमा करणे त्यांचे कर्तव्य आहे.

‘फनेल झोन’ म्हणजे काय?

‘फनेल झोन’ म्हणजे विमानतळाच्या धावपट्टीच्या दोन्ही टोकांपासून सुरू होणारा आणि पुढे काही किलोमीटरपर्यंत विस्तारलेला तो आकाशातील कोनाकार क्षेत्र. याच झोनमधून विमाने टेकऑफ (उड्डाण) आणि लँडिंग (उतरणे) करत असतात. या झोनमध्ये हवेत सुसाट वेगाने हालचाल करणाऱ्या विमानांसाठी ‘निसर्ग रचनेचा रनवे’ असतो, जेथे कोणताही अडथळा, विशेषतः उंच इमारती, खांब, ध्वजस्तंभ वगैरे असू नयेत.

‘फनेल झोन’ का असतो?

१.विमानांच्या सुरक्षित उड्डाण व लँडिंगसाठी स्पष्ट, अडथळामुक्त मार्ग आवश्यक असतो.

२.मी दृश्यमानता, वाऱ्याचा दाब, तांत्रिक अडचणी अशावेळी हा फनेल झोन विमानचालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.

३.जर या झोनमध्ये अडथळे आले, तर विमान लँडिंगवेळी चुकीच्या उंचीवर येऊ शकते आणि अपघाताची शक्यता वाढते.

नियमभंगावर काय कारवाई होऊ शकते?

जर कोणीतरी परवानगीशिवाय फनेल झोनमध्ये नियम मोडत उंच इमारत बांधली, तर:

इमारत पाडण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.

दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

उड्डाण सुरक्षेला धोका असल्याचे स्पष्ट झाल्यास गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.

विमानचालकांसाठी धोकादायक ठरणारी अशी कोणतीही रचना भारतीय नागरी उड्डाण महासंचालनालय किंवा भारतीय विमानतळ प्राधिकरण तातडीने हटवू शकते.

Mopa Airport
Ahmedabad Plane Crash: ब्लॅक बॉक्समधून विमानाचे इंजिन, वेग यांबाबत माहिती मिळणार; अहमदाबाद दुर्घटनेचा अंतिम अहवाल 6 महिन्यांनी

किती उंचीच्या इमारती नको?

भारतीय नागरी उड्डाण महासंचालनालय ठरवलेले नियम यामध्ये लागू होतात. आयकाव (इंटरनॅशनल सिव्हील एव्हीएशन ऑर्गनायझेशन) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार उड्डाण आणि लँडिंगच्या मार्गात ठराविक अंतरावर ठराविक उंचीच्या पलीकडे कोणतीही रचना असू शकत नाही. उदाहरणार्थ, विमानतळाच्या रनवेपासून सुमारे ५ ते १५ किमी अंतरात असलेल्या फनेल झोनमध्ये, ३० मीटरपासून पुढे कोणतीही रचना उभारण्यास पूर्वपरवानगी आवश्यक असते. उंचीवरील मर्यादा ही विमानतळाचा स्तर, धावपट्टीचा दिशानिर्देश आणि इमारतीचे स्थान यावर ठरते. काही क्षेत्रात ही मर्यादा १५ मीटर इतकीही कमी असू शकते.

Mopa Airport
Ahmedabad Flight: अपघात झालेले विमान उतरणार होते 'मोपा'वर! लंडनहून येणार होते गोव्याला; अहमदाबाद दुर्घटनेनंतर वेळापत्रकात बदल

कोणते नियम आहेत?

भारतीय नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून ऑब्स्टॅकल लिमिटेशन सर्फेसीस हे मार्गदर्शक नियम जारी करण्यात आले आहेत. यामध्ये खालील बाबी स्पष्ट केल्या आहेत:

१.विमानतळाच्या २० किलोमीटर परिघात कोणतीही इमारत बांधण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची पूर्वपरवानगी हवी.

२.विशिष्ट उंचीच्या इमारतीच्या बांधकामासाठी ना हरकत दाखला घेणे अनिवार्य आहे.

३.भारतीय नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या ‘ईडीजीसीए’ पोर्टलवरून इमारतीच्या उंचीची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com